शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संघ शाखांत ४४ टक्क्यांहून अधिक वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 10:59 IST

संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: २०१४ साली केंद्रातील सत्ताबदलानंतर याला जास्त जोर आला आहे. मागील आठ वर्षांत संपूर्ण देशभरात संघशाखांमध्ये ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदेशभरात शाखांची संख्या ५९ हजारांहून अधिकसाप्ताहिक मिलनांची संख्याही वाढली

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: २०१४ साली केंद्रातील सत्ताबदलानंतर याला जास्त जोर आला आहे. मागील आठ वर्षांत संपूर्ण देशभरात संघशाखांमध्ये ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २०१४ नंतर संघशाखांची संख्या सुमारे आठ हजारांनी वाढली आहे.गेल्या काही वर्षापासून संघाचा कार्यविस्तारावर भर आहे. संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ््यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. दैनंदिन संघ शाखांसोबतच मासिक मिलन तसेच साप्ताहिक मिलनावरदेखील संघ स्वयसेवकांचा भर दिसून येत आहे. २०१२ साली देशात ४० हजार ८९१ संघ शाखा होत्या. मार्च २०१४ मध्ये हाच आकडा ४४ हजार ९८२ वर गेला. मागील वर्षी मार्च महिन्यात नागपुरात झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या वेळी संघ शाखांची संख्या ५८ हजार ९६७ इतकी होती. वर्तमान स्थितीत ही संख्या ५९ हजार २६६ इतकी झाली आहे. वेगवेगळ््या वयोगटाचा विचार केल्यास शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थी व ४० वर्षाखालील लोकांच्या शाखांची टक्केवारी सुमारे ९० टक्के इतकी आहे. देशपातळीवर संघाकडून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यादेखील शाखा लावण्यात येतात.

मासिक व साप्ताहिक मिलनातदेखील वाढव्यावसायिक व नोकरदारांना अनेकदा कामामुळे दैनंदिन शाखेत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाशी जुळून राहण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. २०१२ मध्ये देशभरात ८५०८ ठिकाणी साप्ताहिक मिलन व्हायचे. वर्तमान स्थितीत १७ हजार २२९ ठिकाणी साप्ताहिक मिलन तर ८ हजार ३८२ ठिकाणी मासिक मिलन शाखा भरविण्यात येतात. २०१७ साली साप्ताहिक मिलन शाखांची संख्या १४,८९६ इतकी होती. तर मागील वर्षी हा आकडा १६,४०५ इतका होता. वर्षभरात साप्ताहिक मिलन शाखांमध्ये ८२४ ने वाढ झाली आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ