शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल अ‍ॅप’वरही संघ ‘दक्ष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 11:04 IST

एरवी माहितीच्या आदान-प्रदानात काहीसा हात आखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत आहे.

ठळक मुद्दे‘सोशल मीडिया’वर समाजाला जोडणारवैचारिक संघर्षासाठी तथ्य मांडणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी माहितीच्या आदान-प्रदानात काहीसा हात आखडता घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेत काही काळापासून बदल होत आहे. संघाकडूनदेखील आता ‘ई-प्लॅटफॉर्म’चा जास्तीत जास्त वापर होत आहे. यातच आणखी एक पाऊल पुढे टाकत संघ परिवारातर्फे आता समाजापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’चा आधार घेण्यात येणार आहे. या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून ‘सोशल मीडिया’वर होणाऱ्या विविध शाब्दिक हल्ल्यांसंदर्भात विविध संदर्भ सादर करत मुद्देसूद तथ्य मांडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१७ मध्ये संघातर्फे ‘सेवागाथा’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू करण्यात आले होते. संघाच्या सेवाकार्यांबाबत यातून माहिती मांडण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून संघावर शाब्दिक हल्ले व आरोपांचे प्रमाण जास्त वाढले आहे. विशेषत: ‘सोशल मीडिया’वर तर संघावर टीकास्त्र सोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. संघाकडून साधारणत: प्रत्येक वेळी टीकांसंदर्भात बाजू मांडण्यात येत नाही. मात्र अशास्थितीत आम्ही ‘सोशल मीडिया’वर आपली बाजू कशी मांडायची, असा प्रश्न वारंवार संघ स्वयंसेवकांकडून उपस्थित करण्यात येत होता.हीच भावना लक्षात घेऊन संघ परिवारातील काही सदस्यांनी एकत्रित येऊन ‘ऋतम्’ हे ‘मोबाईल अ‍ॅप’ तयार केले आहे. यात थेट संघाच्या प्रचार-प्रसारावर भर देण्यात आलेला नाही, तर हे एकप्रकारचे ‘न्यूज अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅप’ असून येथे मोठ्या प्रमाणात बौद्धिक सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच संघ विचारधारेशी जुळलेले विविध ‘मॅगझिन’, वर्तमानपत्रे तसेच लेखकांनादेखील याच्याशी जोडण्यात आले आहे. या माध्यमातून इतिहास, संस्कृती यांच्यासह वर्तमान स्थितीसंदर्भातील विविध साहित्य, व्हिडीओ समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे; सोबतच समाजातील सकारात्मक बाबीदेखील मांडण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वैचारिक मंथनासाठी उचलले पाऊलसंघाबाबतच्या अनेक ‘पोस्ट’ किंवा वृत्त विपर्यास करून मांडण्यात येतात. त्यामुळे नेमके तथ्य व माहिती वैचारिक व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे समाजातदेखील तथ्य हवे तसे पोहोचू शकत नाही. त्यामुळेच विविध माध्यमांवर लिहिणाºयांना, वैचारिक भूमिका मांडणाऱ्यांना एक मंच प्रदान करण्याचे हे माध्यम आहे. त्यांच्या विचारांनादेखील यात स्थान देण्यात येईल. विशेषत: म्हणजे आजच्या वैचारिक लढाईच्या मंथनात विचारांची स्पष्टता यावी यादृष्टीने हे ‘अ‍ॅप’ तयार करण्यात आले असल्याची माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, यासंदर्भात संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणारया ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा संघ परिवारातील विविध संघटनांचा मानस आहे. यासाठी देशभरात १ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ‘सोशल मीडिया’वर एक मोहिमदेखील चालविण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून संघ विचार पोहोचावे यासाठी देशातील विविध भाषांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृतसह उर्दू भाषिकांचादेखील यात विचार करण्यात आला आहे. तीन महिन्यांत एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ