शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस’ इंधनाचा तेल कंपन्यांवर २९०० कोटींचा भुर्दंड

By admin | Updated: April 28, 2017 02:53 IST

एकीकडे सरकार ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचे तुणतुणे वाजवत असताना तीन सरकारी तेल कंपन्यांवर मात्र कॅशलेस पेट्रोलमुळे

सोपान पांढरीपांडे  नागपूर एकीकडे सरकार ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचे तुणतुणे वाजवत असताना तीन सरकारी तेल कंपन्यांवर मात्र कॅशलेस पेट्रोलमुळे तब्बल २९०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ या त्या तीन कंपन्या आहेत. नोटाबंदीनंतर सरकारने ‘कॅशलेस’ पेट्रोल/ डिझेल खरेदी करण्यावर (म्हणजे क्रेडीट/ डेबिट कार्डाद्वारे) प्रचंड भर दिला. त्यासाठी सरकारतर्फे ०.७५ टक्क्यांची सवलतही ग्राहकांच्या खात्यात जमा होते. परंतु याचाच दुसरा भाग म्हणजे कार्ड खरेदीवर लागणाऱ्या ट्रान्झक्शन अथवा सर्व्हिस चार्जचा भुर्दंड कोणी सहन करायचा यावरून तेल कंपन्या व त्याचे डिलर म्हणजे पेट्रोल पंप मालक यांच्यात वाद झाला. याचे कारण पेट्रोलवर डिलरांना कमिशनपोटी रु. २.५० मिळतात तर कॅशलेस व्यवहारासाठी त्यातून तब्बल रु. १.४० ते १.५० रुपये सर्व्हिस चार्ज लागतो. त्यामुळे आम्ही हा भुर्दंड सहन करणार नाही अशी भूमिका पेट्रोलपंप मालकांनी घेतली. नोटाबंदीनंतर सरकारने ‘कॅशलेस’ पेट्रोलवर भर दिल्यामुळे सर्व कंपन्यांचे कार्ड सेल्स म्हणजे क्रेडिट/ डेबिट कार्डाद्वारे होणारी विक्री प्रचंड वाढली. साहजिकच तेल कंपन्या व पेट्रोल डिलरांमधील वादही तीव्र झाला. जानेवारीमध्ये सर्व्हिस चार्जच्या विरोधात पेट्रोल डिलरांनी पंप बंद ठेवण्याची धमकी दिली तेव्हा सरकारने हा सर्व्हिस चार्ज तेल कंपन्यांनी १ एप्रिलपासून द्यावा असा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणून कार्ड सेलवर बँका जो सर्व्हिस चार्ज पेट्रोल डिलरांकडून घेते तो आता तेल कंपनी डिलरच्या खात्यात जमा करते आहे. परिणामी तेल कंपन्यावर हा नवा भुर्दंड आला आहे. पेट्रोल डिझेलसाठी बँका पूर्वी २ ते २.५० टक्के सर्व्हिस चार्ज घेत होत्या. परंतु आता बहुतेक बँकांनी हा दर एक टक्क्यावर आणला आहे. त्यामुळे सर्व्हिस चार्जचा एक टक्का व ग्राहक सवलतीचा ०.७५ टक्का असा एकूण १.७५ टक्क्यांचा भुर्दंड सध्या तेल कंपन्या सहन करीत आहेत. नोटाबंदीपूर्वी हा सर्व भार ग्राहकांवर पडत होता. भुर्दंड २९०० कोटीचा इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांची एकूण उलाढाल रु. ८.४० लाख कोटी आहे. त्यापैकी कार्डद्वारे होणारी विक्री १.६८ लाख कोटी आहे. यावर एक टक्का बँक सर्व्हिस चार्जपोटी रु. १६८० कोटी व ०.७५ टक्के ग्राहक सवलतीपोटी रु.१२६० कोटी असा एकूण २९४० कोटीचा भुर्दंड तिन्ही तेल कंपन्यांवर येणार आहे. या कंपन्यांचा नफा २३,६०० कोटी आहे. तो १२ टक्के घटणार आहे.