शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आरपीएफने पकडला ५७ किलो गांजा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने जीटी आणि एपी एक्स्प्रेसमध्ये ५.७० लाख रुपये किमतीचा ५७ किलो गांजा पकडून दोन आरोपींना ...

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने जीटी आणि एपी एक्स्प्रेसमध्ये ५.७० लाख रुपये किमतीचा ५७ किलो गांजा पकडून दोन आरोपींना अटक केली आहे.

आरपीएफने गांजा तस्करांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एल. मिना, एन. एल. यादव, व्ही. के. पटेल, आय. पी. चौकसे, उमेश यादव, हरविंदर मंगलदीप, मनोज घायगुडे यांनी दोन रेल्वेगाड्यांत गांजा तस्करांविरुद्ध कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस सकाळी ११.३० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पोहोचली. ड्यूटीवर तैनात असलेला आरपीएफ जवान राजेश रमेश गडपलवार आणि धीरज रामकिशन दहिया हे तपास करत सेकंड क्लास एसी कोच ए १ मध्ये पोहोचले. तेथे बर्थ क्रमांक ३९ वरून प्रवास करीत असलेल्या रानकीरेड्डी सुब्बा वेरीकास्वामी (२८), रा. बालारवी, जिल्हा राजमुंद्री, आंध्र प्रदेश याच्या जवळ २ ट्रॉली बॅग संशयास्पद स्थितीत आढळल्या. त्याने रामगुंडमवरून भोपाळला जात असल्याचे सांगितले. बॅगमधील सामानाबाबत विचारणा केली असता तो घाबरला. बॅग उघडून पाहिली असता त्यात २४ पाकिटांमध्ये ४७.८४९ किलो गांजा आढळला. तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टनम-दिल्ली एपी एक्स्प्रेसमध्ये आरपीएफच्या गुप्तचर विभागाने १० किलो गांजा पकडून एका आरोपीला अटक केली. आरपीएफचा जवान भास्करने सूचना पाठविली की, या गाडीत कोच ई २ मध्ये बर्थ क्रमांक ३ आणि ४ खाली गांजा असण्याची शक्यता आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून सीआयबीचे साहनी आणि करवदे गाडीत चढले. त्यांनी बर्थ क्रमांक ३ आणि ४ खाली तपासणी केली असता एका मोठ्या चादरमध्ये काही ठेवलेले होते. तेथे आरोपी खेतावत कृष्णा मंगलता नायक (३२), रा. मैय्या भांडा, पो. रेगुलाबट्टा, जिल्हा नालगोडा बसला होता. त्याने गांजा तस्करी करीत असल्याची कबुली दिल्यामुळे त्यास अटक करण्यात आली.

.........