शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानांना मिळणार ‘बॉडी वेअर कॅमेरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:10 IST

दयानंद पाईकराव नागपूर : रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची ड्यूटी लावण्यात येते; परंतु प्रवासात काही प्रवासी चुकीचे ...

दयानंद पाईकराव

नागपूर : रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची ड्यूटी लावण्यात येते; परंतु प्रवासात काही प्रवासी चुकीचे आरोप लावून आरपीएफ जवानांना अडचणीत आणतात. अशा प्रसंगासाठी आता आरपीएफच्या जवानांना बॉडी वेअर कॅमेरा देण्यात येणार असून, नागपूर विभागात २५ बॉडी वेअर कॅमेरे मागविण्यात आले आहेत.

रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या सुविधेसाठी आरपीएफ जवानांची गस्त लावण्यात येते. हे जवान संपूर्ण रेल्वेगाडीत प्रवासी सुरक्षित आहेत की नाही, हे पाहण्यासाठी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये फिरत असतात. एखाद्या प्रवाशाला काही अडचण असल्यास त्यांना हे जवान मदत करतात, तर अनेकदा एकट्या प्रवास करीत असलेल्या महिला आणि युवतींना काही असामाजिक तत्त्व त्रास देत असल्यास त्यांचा बंदोबस्तही आरपीएफ जवान करतात; परंतु आपले कर्तव्य बजावत असताना काही असामाजिक तत्त्व आरपीएफ जवानांवर चुकीचे आरोप लावतात. त्यासाठी आता आरपीएफ जवानांना बॉडी वेअर कॅमेऱ्याचे कवच मिळणार आहे. रेल्वेगाडीत कर्तव्य बजावत असलेल्या आरपीएफ जवानाच्या छातीवर हा कॅमेरा असणार आहे. यात तो ड्यूटी करीत असलेल्या संपूर्ण कालावधीचे चार ते पाच तासांचे व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. यामुळे कोणी काहीही आरोप करो ते सगळे या कॅमेऱ्यात टिपले जाणार आहेत. आगामी काही दिवसांतच २५ कॅमेरे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दाखल होणार आहेत. त्यासाठी जवळपास २५ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती आहे.

..........

बॉडी वेअर कॅमेऱ्यामुळे येणार पारदर्शकता

‘आरपीएफ जवान रेल्वेगाड्यांत कर्तव्य बजावताना काही असामाजिक तत्त्व चुकीचे आरोप लावतात. बॉडी वेअर कॅमेरा जवानांकडे असल्यामुळे त्यांच्या ड्यूटीच्या काळातील संपूर्ण नोंदी या कॅमेऱ्यात टिपल्या जाणार आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजात पारदर्शकता निर्माण होईल.’

-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल

..........