शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानांनी जबाबदारीने कार्य करावे

By admin | Updated: September 24, 2016 01:26 IST

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाने मागील वर्षभरात पार पाडलेली कामगिरी कौतुकास्पद असून

बृजेश कुमार गुप्ता : आरपीएफचा ३२ वा स्थापना दिन उत्साहातनागपूर : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाने मागील वर्षभरात पार पाडलेली कामगिरी कौतुकास्पद असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी केले.अजनी येथील आरपीएफ परेड मैदानात आरपीएफच्या ३२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, सिनिअर डीसीएम कुश किशोर मिश्र, आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, भगवान इप्पर, लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर उपस्थित होते. ‘डीआरएम’ गुप्ता यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या एकंदर कामकाजावर समाधान व्यक्त करून त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी वर्षभरात आरपीएफने पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. समारंभात ‘डीआरएम’ गुप्ता यांच्या हस्ते बेस्ट परफॉर्मन्स आणि रेल्वे अ‍ॅक्ट केसेससाठी नागपूर ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना पदक देऊन गौरविण्यात आले तर बेस्ट क्राईम कंट्रोलसाठी चंद्रपूर ठाण्याचे निरीक्षक एस. एस. ठाकूर, बेस्ट इन्व्हेस्टिगेशन शिल्ड वर्धाचे निरीक्षक सुरेश कांबळे यांना देण्यात आले. ‘डीआरएम’ गुप्ता यांनी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. परेडचे नेतृत्व महिला आरक्षक प्रिस्मा शर्मा यांनी केले. पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व किरण नगराळे, दुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व स्वाती शिंदे, तिसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व ज्योती दीक्षित आणि श्वान पथक प्लाटूनचे नेतृत्व अश्विनी मुळतकर यांनी केले. परेडनंतर श्वान पथकाच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आरपीएफचे अधिकारी, जवान, महिला आरक्षकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. (प्रतिनिधी)