शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसह ९ तिकिट दलालांवर आरपीएफची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:25 IST

३१७४६ रुपयांची १४ ई-तिकिटे जप्त : १९५ जुनी तिकिटेही सापडली नागपूर : रेल्वे सुरक्षा दल नागपूरने संपूर्ण विभागात एकाच ...

३१७४६ रुपयांची १४ ई-तिकिटे जप्त : १९५ जुनी तिकिटेही सापडली

नागपूर : रेल्वे सुरक्षा दल नागपूरने संपूर्ण विभागात एकाच दिवशी धाड टाकून महिलेसह नऊ अवैध तिकीट दलालांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१७४६ रुपयांची १४ लाईव्ह तिकिटे आणि १९५ जुन्या तिकिटांसह एकुण ३ लाख ४३ हजार १५२ रुपयांची तिकिटे जप्त केली आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरसह बल्लारपुर, मूलताई, वर्धा, माजरी आणि चंद्रपूरमध्ये धाडी टाकण्यात आल्या. पकडण्यात आलेल्या सर्व दलालांविरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात तिघांना अटक

नागपूर शहरात आरपीएफने तीन दलालांना अटक केली आहे. यात जरीपटका येथील रहिवासी स्वाती किसन चंदरामनानी, इकबाल अहमद आणि भांडेवाडी येथील रहिवासी पवन शंभु पांडे अशी या दलालांची नावे आहेत. यातील स्वातीकडे आयआरसीटीसीचे अधिकृत लायसन्स असूनही ती पर्सल आयडी वरून तिकिट काढून प्रवाशांकडून कमिशन वसुल करीत होती. तिच्याकडून ८०७८ रुपयांच्या ९ जुन्या तिकीट जप्त करण्यात आल्या. तसेच भांडेवाडी येथील रहिवासी पवन जवळ ७७८७९ रुपयांच्या ६२ तिकीट मिळाल्या. या तिकीट त्याने बनावट आयडीवरून काढल्या होत्या. तर तर मुन्नी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या नावाने दुकान चालविणाऱ्या इकबाल अहमदजवळ ८३३५ रुपयांच्या ७ तिकीट मिळाल्या. ही तिकिटेही त्याने बनावट आयडीवरून बुक करून ग्राहकांकडून कमिशन वसूल करीत होता.

माजरीत १.६२ लाखाच्या तिकीट जप्त

चंद्रपूर येथील माजरी येथून आर वर्ल्ड कॅफेचे संचालक रामनंद कैलाश मिस्त्री यांच्याकडून सर्वात अधिक १ लाख ६२ हजार २९० रुपयांच्या तिकिट मिळाल्या. यातील २९१४९ रुपयांच्या १२ लाईव्ह तिकिट आणि १ लाख ३३ हजार १४० रुपयांच्या पोस्ट तिकीट होत्या. विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत विभागीय मुख्यालयातून विशेष टीम तयार करून नागपूर, अजनी, बल्लारशाह, आमला, चंद्रपूर आणि वर्धा येथे पाठविण्यात आल्या. तेथून स्थानिक आरपीएफ अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने धाडी टाकण्यात आल्या.

...............