शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

संघाची भूमिका, से नो टू ‘नोटा’ : १०० टक्के मतदानासाठी आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 20:10 IST

निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारापासून दोन हात लांब राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’च्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. मतदारांनी ‘नोटा’चा वापर करु नये, असे आवाहनच संघाकडून करण्यात आले आहे. मतदानात ‘नोटा’ची तरतूद असली, तरी त्याचा वापर करु नका. योग्य उमेदवाराला मत द्या, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठळक मुद्देउपलब्ध पर्यायातून चांगल्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारापासून दोन हात लांब राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’च्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. मतदारांनी ‘नोटा’चा वापर करु नये, असे आवाहनच संघाकडून करण्यात आले आहे. मतदानात ‘नोटा’ची तरतूद असली, तरी त्याचा वापर करु नका. योग्य उमेदवाराला मत द्या, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मागील काही काळापासून ‘नोटा’मुळे देशातील अनेक जागांवर उलटफेर पहायला मिळाले आहेत. त्यामुळे संघाने ‘नोटा’च्या विरोधातच भूमिका घेतली आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमातदेखील नोटा वापरला तर तोटा होईल, असे विधान केले होते. मतदानादरम्यान ‘नोटा’ वापरले तर तोटा होऊ शकतो. त्यामुळे सद्यस्थितीत जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी सर्वोत्तम व राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मत द्यावे, असे आवाहन त्यांनी केले होते.पक्षीय राजकारण, जातिसंप्रदायांच्या प्रभावाचे राजकारण यापासून संघ सुरुवातीपासूनच दूर राहत आला आहे व पुढेदेखील दूरच राहणार. मात्र संघाचे स्वयंसेवक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडत असतात. मतदारांनी राष्ट्रहिताला सर्वतोपरी मानत स्वार्थ, संकुचित भावना, भाषा, प्रांत, जाती यापलिकडे जाऊन विचार केला पाहिजे. उमेदवाराची प्रामाणिकता व क्षमता, पक्षाच्या धोरणाची राष्ट्रहितासोबतची प्रतिबद्धता तसेच वर्तमान कार्यांचे अनुभव याआधारावर मतदारांनी मत दिले पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे.शतप्रतिशत मतदान करामतदान न करणे किंवा ‘नोटा’च्या अधिकाराचा उपयोग करणे हे सर्वात अयोग्य असलेल्या उमेदवाराला फायदा पोहोचविणारे ठरते.त्यामुळेच १०० टक्के मतदान आवश्यक आहे. भारताच्या निवडणूक आयोगाकडून १०० टक्के मतदानाचा आग्रह धरला जातो, असे प्रतिपादन संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019