शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नागपूरला करायचेय ‘रोल मॉडेल’

By admin | Updated: September 15, 2015 05:57 IST

हे स्पर्धेचे युग आहे. राज्याराज्यांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू आहे. नागपूर शहर विकासात पुढे चालले आहे. या शहराची

नागपूर : हे स्पर्धेचे युग आहे. राज्याराज्यांमध्ये विकासाची स्पर्धा सुरू आहे. नागपूर शहर विकासात पुढे चालले आहे. या शहराची ओळख ‘आॅरेंज सिटी’, ‘ग्रीन सिटी’ व ‘झिरो माईल’ अशी आहे. आता देशातील शैक्षणिक ‘हब’ व उद्योगांचे शहर अशी नवीन ओळख प्रस्थापित करायची आहे. हे शहर देशासाठी ‘रोल मॉडेल’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर महापालिकेचा १५१ वर्षे पूर्णत्व सोहळा सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकापूर येथील क्रीडा संकुलात पार पडला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपुरात केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. देशभरातील विविध राज्यांतून येथे लोक नोकरीला येतात. मात्र, शहरातील आपुलकी, एकमेकांना जपण्याचा स्वभाव यामुळे त्या लोकांनाही हे शहर आपलेसे वाटू लागते व निवृत्तीनंतरही ते येथेच स्थायिक होतात. येथे प्रत्येक जातीधर्माचे लोक आनंदाने राहतात. त्यामुळे नागपूरला लहान भारताचा चेहरा प्राप्त झाला आहे. शहर विकासाच्या वाटेवर असताना नगर प्रशासनासोबतच नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांनी यात साथ दिली तर विकासाची गाडी पुढे नेण्यास मदत होईल. महापालिकेला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. शहराच्या विकासात राज्य सरकार महापालिकेच्या सोबत असेल, असा विश्वास देत महापालिकेने पाठविलेल्या विकासाच्या सर्व प्रस्तावांमध्ये राज्य सरकार आपला वाटा देईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वस्त केले. महापौर प्रवीण दटके म्हणाले, १५० वर्षांत नागपूरचा विविध क्षेत्रात विकास झाला. यात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक अशा सर्र्वांचाच सहभाग आहे, असे प्रतिपादन महापौर प्रवीण दटके यांनी केले. नागपूर महापालिकेचा इतिहास गौरवशाली आहे. १८६४ साली महापालिकेची स्थापना झाली. ३४ गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. त्यावेळी नागपूर शहराचे क्षेत्र १५.५ चौ.कि.मी. होते तर लोकसंख्या ८२ हजार होती. केरोसीनचे पथदिवे होते. आता महापालिकेला १५० वर्षे पूर्र्ण झाली आहेत. आज शहराचे क्षेत्रफळ २२७.२९ चौ.कि.मी. झाले असून, लोकसंख्या २४ लाखांंवर गेली आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, कचऱ्याचे नियोजन, झोपडपट्टी विकास, शहरातील रस्ते, उड्डाणपुलाची निर्मिती यासोबतच प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. महापालिकेने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प, ग्रीन बस, स्वच्छता अभियान यासोबतच शहर विकासाचे प्रकल्प हाती घेतले आहे. केंद्र सरकारने नागपूर शहराची ‘स्मार्ट सिटी’साठी निवड केली आहे. शहराच्या विकासात लोकप्रतिनिधी व प्रशासनाचेही योगदान असल्याचे दटके म्हणाले. (प्रतिनिधी)नागपूर महोत्सवात राज्य सरकार सहभागी होणारमहापालिकेतर्फे दरवर्षी नागपूर महोत्सव आयोजित केला जातो. महापालिकेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यावर्षी आयोजित होणाऱ्या या महोत्सवात राज्य सरकारही सहभागी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या महोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले जाईल व यामुळे देशालाच नव्हे तर जगाला नागपूर इतिहास माहीत होईल, असेही फडणवीस म्हणाले. नागपूरच्या विकासात महापालिकेचे योगदान - गडकरी नितीन गडकरी म्हणाले, नागपूर हे देशाचे हृदय असून, देश व राज्याला अनेक चांगले राजकीय नेते शहराने दिले आहेत. नागपूरचे पहिले महापौर बॅ. शेषराव वानखेडे हे राज्य मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. महापौर राहिलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. नागपूर शहराच्या विकासात महापालिकेचे मोठे योगदान आहे. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना राबविणारे हे देशातील पहिले शहर असून, देश-विदेशातदेखील या प्रणालीचे सादरीकरण झाले आहे. आता शहरात पाण्यासाठी एकही मोर्चा निघत नाही. महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी राज्य सरकारला विकते आहे. यापासून १८ कोटी रुपयांची रॉयल्टी महापालिकेला मिळत आहे. सांडपाण्यापासून निघणाऱ्या सीएनजीवर शहर बस चालविण्याचा संकल्प आहे. येथे इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली बस सुरू झाली आहे. गोंडराजे, राजे भोसले अशी ऐतिहासिक परंपरा या शहराला लाभली आहे. हे शहर जसे स्वच्छ शहर म्हणून पुढे येईल तसेच ते इतिहास, वारसा व संस्कृतीचे शहर म्हणूनही नावारूपास येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. क्षणचित्रेउपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत के ले. राष्ट्रपतींचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर वायुसेनेच्या बॅण्ड पथकाने राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचा समारोपही राष्ट्रगीताने करण्यात आला.महापालिकेच्या प्रथेनुसार महापौर प्रवीण दटके यांनी तुळशीचे रोप देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्वागत केले, तसेच राष्ट्रपतींना मानपत्र भेट दिले.मानपत्राचे वाचन महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी केले. उपमहापौर गणेश पोकुलवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत महापालिकेचे विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केले. महापालिकेच्या १५१ वर्षे पूर्णत्व सोहळ्यानिमित्ताने पन्नालाल देवडिया विद्यालयाचे विद्यार्थी लाल रंगाचा गणवेश परिधान करून स्टेडियमच्या पायऱ्यांवर १५१ च्या आकारात बसले होते. महापालिकेचा शिक्षण विभाग व मैत्री परिवार यांनी यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या विकास योजना तसेच लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. सोहळ्याला उपस्थित निमंत्रित. नगरसेवक व पदाधिकारी आणि विशेष निमंत्रितांचे महापालिकेच्यावतीने दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी होणार असल्याने मनपाचे अधिकारी ड्रेसकोडमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आलेल्या निमंत्रितांच्या दुचाकी वाहनांची पार्किंग सुविधा संकुलापासून लांब अंतरावर करण्यात आली होती. येथे जाणारा रस्ताही चांगला नसल्याने त्यांची गैरसोय झाली. राष्ट्रपतींच्या ताफ्यात ५० गाड्यांचा समावेश होता. त्यांच्या आगमनाच्या ३० मिनिटापूर्वी प्रवेश बंद करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संकुलातून बाहेर पडल्यानंतर १० मिनिटांनी गेट उघडण्यात आले. त्यानंतर निमंत्रित बाहेर पडले.राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. पासधारकांनाच संकुलात प्रवेश होता. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.