शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल मार्गदर्शकाच्या भूमिकेतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:12 IST

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना सध्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजवावी लागत आहे. कारण ज्या ठिकाणी आता मतदान होणार आहे, तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्यांच्याकडून मतदानाचे नियोजन व एकूणच तयारीबाबत माहिती जाणून घेत आहेत. जिल्हाधिकारी मुदगलसुद्धा त्यांना केवळ माहितीच नव्हे तर एकूणच नियोजनाची काटेकोर माहिती करून देत मदत करीत आहेत.

ठळक मुद्देइतर भागातील निवडणूक निर्णय अधिकारी घेताहेत मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना सध्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजवावी लागत आहे. कारण ज्या ठिकाणी आता मतदान होणार आहे, तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्यांच्याकडून मतदानाचे नियोजन व एकूणच तयारीबाबत माहिती जाणून घेत आहेत. जिल्हाधिकारी मुदगलसुद्धा त्यांना केवळ माहितीच नव्हे तर एकूणच नियोजनाची काटेकोर माहिती करून देत मदत करीत आहेत.देशातील लोकसभा निवडणुका या एकूण सात टप्प्यात होणार आहेत. महाराष्ट्रात त्या चार टप्प्यात पार पडतील. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान हे पहिल्याच टप्प्यात पार पडले. एकूण नियोजनासाठी कमी कालावधी मिळाला असला तरी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात निवडणूक विभागासह एकूणच प्रशासनाने मतदानापर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार पाडला आहे. यावेळी निवडणूक विभागाचे निवडणूक विभागाला अनेक नवीन निर्देश होते. त्यात मतदान केंद्रांवर दिव्यांगांना सोई सुविधा पुरविण्यापासून तर मतदान केंद्रावर लाईव्ह नजर ठेवण्यापर्यंतचा समावेश होता. या दोन्ही बाबतीत नागपूर जिल्ह्याचे कार्य सर्वांत उत्तम राहिले. दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांवर विविध सुविधा पुरवण्यासाठी निवडणूक आयोगाने एक स्वतंत्र अ‍ॅप तयार केला होता. त्याचा यथोचित उपयोग करून घेण्यासाठी नागपुरात स्वतंत्रपणे समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्यात आली. जवळपास ४५० मतदान केंद्रांवर लाईव्ह वेब कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात संवेदनशील मतदान केंद्रासह इतर केंद्रांवरही प्रत्यक्ष मतदनावर थेट नजर ठेवता आली. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. गेल्या निवडणुकीचा विचार केल्यास यंदा मतदार यादीतील घोळाबाबत फारशा तकारी आढळून आल्या नाहीत. पहिल्या टप्प्यातील एकूण मतमोजणीपर्यंतचा टप्पा यशस्वीपणे पार पडल्याने इतर भागातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नागपूरकडे विशेषत्वाने लक्ष ठेवून आहेत.त्यामुळे मतमोजणीपर्यंतच्या नियोजनाबाबत ते जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे विचारणा करीत आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीसुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला असून आपण त्यांना योग्य ते सहकार्य करीत असल्याचे सांगितले आहे.निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनाही असाच अनुभवमहाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका २३ एप्रिल रोजी होणार आहेत. तर चौथ्या टप्प्याच्या निवडणुका २९ एप्रिल रोजी होतील. जिल्हाधिकारी मुदगल यांना ज्याप्रकारे त्यांच्या समकक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाबाबत विचारणा करीत मदत मागितली जात आहे. तसाच अनुभव नागपूरच्या निवडणूक विभागातील इतर अधिकाऱ्यांनाही येत आहेत. उपजिल्हानिवडणूक अधिकाऱ्यांपासून तर इतर अधिकाऱ्यांनाही इतर जिल्ह्यातील त्यांच्या समकक्ष व परिचित असलेल्या अधिकाऱ्यांकडून अशीच विचारणा होत असून नियोजनाबाबत मदत मागितली जात आहे. एकूणच नागपूर हे सध्या निवडणुकीसाठी इतरांना मार्गदर्शक ठरत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019