शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रोहित देव, मनीष पितळे, अरुण उपाध्ये,

By admin | Updated: June 6, 2017 01:44 IST

मुंबई उच्च न्यायालयातील चौदा नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींपैकी रोहित देव, मनीष पितळे, अरुण उपाध्ये व मुरलीधर गिरटकर यांना नागपूर खंडपीठामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.

मुरलीधर गिरटकर यांची नागपूर हायकोर्टात नियुक्तीउद्यापासून नवीन रोस्टर : एकूण १७ न्यायमूर्ती करतील कामलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील चौदा नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींपैकी रोहित देव, मनीष पितळे, अरुण उपाध्ये व मुरलीधर गिरटकर यांना नागपूर खंडपीठामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. उद्या, मंगळवारपासून नागपूर खंडपीठात १७ न्यायमूर्तींचे नवीन रोस्टर लागू होणार आहे. नागपूर खंडपीठामध्ये न्यायमूर्तींची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तसेच, नागपूर खंडपीठामध्ये इतिहासात पहिल्यांदाच पाच द्विसदस्यीय न्यायपीठे बसणार असून एकसदस्यीय न्यायपीठे सात राहणार आहेत.नवीन रोस्टरनुसार, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्याकडे जनहित याचिका, १९९६ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, १९९८, २०००, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२, २०१४, २०१६ व २०१७ मधील दिवाणी रिट याचिका आणि लेटर्स पेटेन्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांच्याकडे १९९७, १९९९, २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, प्रथम अपील्स, न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व मुरलीधर गिरटकर यांच्याकडे फौजदारी प्रकरणे, न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व स्वप्ना जोशी यांच्याकडे २०१० पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका तर, न्यायमूर्तीद्वय एम. एस. संकलेचा व मनीष पितळे यांच्याकडे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांशी संबंधित रिट याचिका व अपील्सची जबाबदारी राहणार आहे.एकसदस्यीय न्यायपीठांमध्ये न्यायमूर्ती प्रदीप देशमुख सर्व विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका व सर्व सम वर्षांतील फौजदारी रिट याचिका, न्यायमूर्ती सुनील शुक्रे प्रथम अपील्स, विषम वर्षांतील अपील्स फ्रॉम आॅर्डर्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज, दिवाणी अवमानना संदर्भ, किरकोळ अर्ज, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर द्वितीय अपील्स व दिवाणी प्रकरणे, न्यायमूर्ती झेड. ए. हक सम वर्षांतील फौजदारी अपील्स, जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज, न्यायमूर्ती विनय देशपांडे विषम वर्षांतील फौजदारी रिट याचिका व फौजदारी अपील्स, न्यायमूर्ती इंदिरा जैन सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका तर, न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी सम वर्षांतील प्रथम अपील्स, अपील्स फ्रॉम आॅर्डर्स व दिवाणी पुनर्विचार अर्जांचे कामकाज पाहतील.