शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकलमध्ये १२ आठवड्यात कार्यान्वित होणार रोबोटिक सर्जरी सिस्टीम

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 1, 2023 17:01 IST

Nagpur News मेडिकलमध्ये येत्या १२ आठवड्यात रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापित केली जाईल, अशी ग्वाही हाफकिन इन्स्टिट्यूटने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देहाफकीन इन्स्टिट्यूटची उच्च न्यायालयाला ग्वाही

राकेश घानोडेनागपूर : मेडिकलमध्ये येत्या १२ आठवड्यात रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापित केली जाईल, अशी ग्वाही हाफकिन इन्स्टिट्यूटने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. राज्यामधील सरकारी रुग्णालयांना आवश्यक औषधे व वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची जबाबदारी हाफकिन इन्स्टिट्यूटकडे आहे. ते रोबोटिक सर्जरी यंत्र अमेरिकेतून आणणार आहेत.

विदर्भातील सरकारी रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रोबोटिक सर्जरी सिस्टीमसाठी राज्य सरकारने २१ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे असताना रोबोटिक सर्जरी सिस्टीम स्थापनेसाठी विलंब केला जात होता. त्यामुळे न्यायालयाने हाफकिन इन्स्टिट्यूटला फटकारले होते. रोबोटिक सर्जरी सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर मेडिकल हे सदर अत्याधुनिक सुविधा असलेले मध्य भारतातील पहिले रुग्णालय ठरेल. या सिस्टीमचे विविध फायदे आहेत. या सिस्टीमद्वारे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण तातडीने बरे होतात. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताचा अधिक प्रमाणात अपव्यय होत नाही. शस्त्रक्रिया अचूकपणे केली जाते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय