शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

आरटीओ चेक पोस्टवर वाहनचालकांची लूट

By admin | Updated: November 30, 2015 02:34 IST

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावणाऱ्या वाहनांकडून कर (टॅक्स) जमा करण्यासाठी आणि त्या वाहनांना तात्पुरता परवाना (टीपी) ...

बिनबोभाट लाखोंची वसुली : वाहनचालकांमध्ये असंतोषएका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावणाऱ्या वाहनांकडून कर (टॅक्स) जमा करण्यासाठी आणि त्या वाहनांना तात्पुरता परवाना (टीपी) देण्यासाठी विदर्भात देवरी, सावनेर, कांद्री (रामटेक), देवाडा (राजूरा) आणि पिंपळखुटी, वरुड, खरबीजवळ आरटीओच्या चेक पोस्ट आहेत. या सर्वच ठिकाणांवर वाहनचालकांची अक्षरश: लूट होत असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी आहेत. प्रत्येक वाहनचालकाकडून एन्ट्री फीच्या नावाखाली ३०० रुपये घेतले जातात. तर, परप्रांतातून आलेल्या वाहनचालकाला एक तात्पुरता परवाना देण्यासाठी १८०० रुपये घेऊन ९०० रुपयांची पावती त्याच्या हातात ठेवली जाते. (ही रक्कम वाहनांनुसार बदलते!) वाहनचालकाने आगावू पैसे देण्यास विरोध केला तर त्याच्या कागदपत्रे तपासणीत त्रुटी दाखवून वाहन अडवून धरले जाते. सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा तसेच पोलिसांच्या हवाली करण्याचा येथे कार्यरत खासगी व्यक्ती धमक्या देतात. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, एका चेक पोस्टवरून एका दिवसात किमान १६०० ते १८०० वाहने धावतात. त्यांच्याकडून रोज बिनबोभाट ही वसुली केली जाते. अर्थात् एका चेकपोस्टवर दरदिवशी या अवैध कमाईची अक्षरश: बरसात होते. ही रक्कम मोजण्यासाठी आणि तिचा हिशेब ठेवण्यासाठी वेगळी मंडळी ठेवली जात असल्याची माहिती असून, गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यापूर्वी चंद्रपुरात पोलीस अधीक्षक होते. तेथून बदली होण्यापूर्वी त्यांच्या नजरेत आरटीओ चेक पोस्टवरील गोरखधंदा आला. कारवाईची योजना आखत असतानाच त्यांची बदली झाली. नागपुरात एसीबीची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी देवाडा चेक पोस्टवर कारवाईसाठी अभ्यासपूर्ण सापळा लावला. त्यानंतर रुक्मीणीकांत भगवान कळमनकर (चंद्रपूर) या मोटर वाहन निरीक्षकाला अतिशय शिताफीने पकडण्यात आले. त्याने वाहनचालकांकडून पैसे गोळा करण्यासाठी आणि ही रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे एजंट ठेवले होते. त्यातीलच राजू टोंगे यालाही एसीबीने अटक केली होती. त्यांच्याकडून मोठी रक्कमही यावेळी जप्त करण्यात आली होती.