शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नागपुरात लुटारूंची टोळी गवसली : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 20:57 IST

मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या धारकाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा इमामवाडा पोलिसांनी छडा लावला. यातील तिघांना अटक करून दोन गुन्ह्यात चार लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्दे११ महागडे मोबाईल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असलेल्या धारकाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा इमामवाडा पोलिसांनी छडा लावला. यातील तिघांना अटक करून दोन गुन्ह्यात चार लाखांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.मंगळवारी १२ मार्चला इमामवाड्यात एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागल्याचेही रोशन यांनी स्पष्ट केले. इमामवाड्यातील अनिकेत अपार्टमेंटमध्ये राहणारा वैभव गुलाबराव देशमुख (वय २१) हा मोबाईलवर बोलत रस्त्याने जात होता. अचानक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तीन लुटारूंनी त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. त्याने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार मुकुंद साळुंके यांनी आपल्या सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी निर्जनस्थळी साध्या वेशात गस्त घालण्यास सांगितले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटवदकर हवलदार परमेश्वर कडू, रामेश्वर कडवे, श्रीकांत ठाकूर, अनंता बुरडे, शरद चव्हाण, शिपाई बाळू गिरी, राहुल झाडे,सुशील रेवतकर, विजय भोयर आणि किशोर येऊल हे लुटारूंच्या शोधात असताना रात्री ११ च्या सुमारास या पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर चेतन मदनलाल सूर्यवंशी (वय २०, रा. बिनाकी मंगळवारी, कांजी हाऊस चौक), कपिल प्रेमदास धारगावे (वय १९, रा. बिनाकी मंगळवारी) आणि अबोध देवानंद निमगडे (वय १९, रा. यशोधरानगर) हे तिघे संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. संशय बळावल्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रस्त्याने जाणाऱ्यांचे मोबाईल लुटल्याची कबुली दिली. अशा प्रकारे त्यांनी इमामवाडा येथे दोन तर आणि सदर, गणेशपेठ आणि सक्करदरा येथे प्रत्येकी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानक परिसरातूनही चार मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड लाख रुपये किंमतीचे एकूण ११ महागडे मोबाईल जप्त केले.कोठडीतून दुसऱ्या टोळीचा छडाया तिघांची पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्यांनी यशोधरानगर येथे शुभम उत्तम सोनवणे (वय २०) हा आणि त्याची टोळी वाहनचोरीत सक्रिय असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले.त्याने आपल्या तीन विधी संघर्षग्रस्त साथीदारांसह आठ वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यावरून तिन्ही मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी यशोधरानगर, तहसील आणि इमामवाडा परिसरातून तीन दुचाकी चोरल्या तर, सदर, गिट्टीखदान, पाचपावली, यशोधरानगर, धंतोली परिसरातून पाच दुचाकी चोरल्याचीही त्यांनी कबुली दिली. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी अडीच लाखांची वाहने जप्त केली आहे.वाहनचोरीसाठी विद्यार्थ्यांचा वापरया गुन्ह्याच्या छड्यातून वाहन चोरीसाठी अट्टल चोरटे लहान मुलांचा, विद्यार्थ्यांचा वापर करीत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. बनावट चावीने दुचाकीचे कुलूप उघडून ही टोळी वाहने चोरून नेत होते. लहान मुले असल्याने त्यांचा कुणाला संशय येत नाही. ही बाब टोळीप्रमुखाच्या लक्षात असल्याने त्याने चोरीसाठी लहान मुलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचा वापर करून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. चोरीत सक्रिय असलेल्यांपैकी दोघे आठवी आणि नववीत शिकत असल्याचेही रोशन यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेला सहायक पोलीस आयुक्त घार्गे, इमामवाड्याचे ठाणेदार मुकुंद साळुंके प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :RobberyदरोडाArrestअटक