शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

लुटीचा एम्प्रेस मॉल

By admin | Updated: October 30, 2016 02:58 IST

एम्प्रेस मॉलमध्ये पीव्हीआर चित्रपटगृह आणि २५० पेक्षा जास्त छोट्यामोठ्या शोरूम असून तिथे येणाऱ्या सर्व ग्राहकांना नि:शुल्क पार्किंग

पार्किंगच्या नावावर नागरिकांना फटका नागपूर : एम्प्रेस मॉलमध्ये पीव्हीआर चित्रपटगृह आणि २५० पेक्षा जास्त छोट्यामोठ्या शोरूम असून तिथे येणाऱ्या सर्व ग्राहकांना नि:शुल्क पार्किंग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची पर्यायी महानगरपालिकेची आहे. पण आर्थिक व्यवहारामुळे मनपाचे अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई करीत नाहीत. मॉल मालकाने पार्किंग कंत्राटी पद्धतीवर विकल्याचा आरोप पीव्हीआरच्या प्रेक्षकांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना केला.पार्किंग नि:शुल्क असावेएखाद्या फ्लॅटप्रमाणे एम्प्रेस मॉलमध्ये नि:शुल्क पार्किंग असावे, अशी मागणी प्रेक्षकांनी केली. या मॉलमध्ये दररोज जवळपास १० हजारपेक्षा जास्त लोक येतात. सणानिमित्त खरेदी करणाऱ्यांची संख्या २० हजारांपेक्षा जास्त असते. मॉलबाहेर गाडी उभी केल्यास वाहतूक पोलीस उचलून नेण्याची भीती असते. त्यामुळे मॉलच्या बेसमेंटमध्ये दुचाकी चालकांकडून १५ रुपये आणि चारचाकीसाठी ३० रुपये शुल्क आकारण्यात येते. पार्किंग शुल्काद्वारे दररोज दीड ते तीन लाखांची अवैध वसुली केली जाते. वाद नको म्हणून गाडीचालक मुकाट्याने पार्किंग शुल्क देतात. मालकाने पार्किंग कंत्राटी पद्धतीवर विकल्याने कंत्राटदाराची अरेरावी, ही नेहमीची बाब आहे. गाडीची रसीद हरविल्यास अतिरिक्त १०० रुपयांची वसुली कंत्राटदार करीत असल्याचा आरोप प्रेक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला. इमारत बांधताना पार्किंगसाठीजागा सोडणे बंधनकारकबांधकाम करताना वाहने ठेवण्यासाठी जागा सोडावी, असा नियम आहे. अनेक ठिकाणी नियमाची पायमल्ली होत असल्याची बाब वेळोवेळी पुढे आली आहे. बिल्डरने फ्लॅट स्कीममध्ये जास्त नफा कमविण्याच्या नादात पार्किंग आणि टेरेसवर फ्लॅट बांधून विकल्याच्या तसेच मंजूर नकाशापेक्षा दुप्पट वा तिप्पट एफएसआय वापरून इमारती उभ्या केल्या केल्याच्या हजारो तक्रारी मनपाकडे प्रलंबित आहेत. पण बिल्डरशी साठगाठ आणि आर्थिक व्यवहारामुळे मनपाचा कुणीही अधिकारी तत्परतेने कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. हीच बाब एम्प्रेस मॉलमधील अवैध पार्किंगच्या संदर्भात लागू होते. मॉलमधील पार्किंग मोकळी करून देण्याची मागणी पीव्हीआरचे पे्रक्षक आणि ग्राहकांनी लोकमतशी बोलताना केली.