शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

लुटारू पाेलिसांच्या जाळ्यात : रायफलसह कार जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 23:37 IST

Robber arrested, crime news चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार करून नागपूर, देवलापारमार्गे मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या तीन लुटारूंना देवलापार पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव टेक शिवारात नाकाबंदी करून अटक केली.

ठळक मुद्देदेवलापार पाेलिसांची मानेगाव टेक परिसरात कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कदेवलापार/हिवरा बाजार : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार करून नागपूर, देवलापारमार्गे मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या तीन लुटारूंना देवलापार पाेलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव टेक शिवारात नाकाबंदी करून अटक केली. त्यांच्याकडून कार आणि १२ बाेरची रायफल जप्त केली. ही कारवाई बुधवारी (दि. ६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.प्रदीप अजित सिंग (२४), जयप्रकाश विजेंद्र सिंग (२६) व सूरज रतवीर सिंग (२७) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे असून ते हरियाणातील रहिवासी आहेत. लूटमारीच्या घटनेतीन तीन आराेपी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने मध्य प्रदेशात पळून जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलीस अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या सूचनेवरून देवलापार (ता. रामटेक) पाेलिसांनी मध्य प्रदेशच्या सीमेवरील त्यांच्या हद्दीत येणाऱ्या मानेगाव टेक येथे नाकाबंदी केली.समाेर पाेलिसांना पाहताच (एचआर-२६/बीजे-४८६०) क्रमांकाच्या कारने जात असलेल्या आराेपींनी दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड यांनी त्यांच्यावर पिस्टल राेखून अडविले आणि कारची झडती घेतली. त्यांना कारच्या डॅशबाेर्डमध्ये लपवून ठेवलेली १२ बाेरची रायफल आढळून आली. तिन्ही आराेपी चंद्रपूर जिल्ह्यातून पळून आल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

...राजुरा पाेलिसांच्या स्वाधीन

या तिघांनी राजुरा (जिल्हा चंद्रपूर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमार केली आणि तिथून पळून ते मध्यप्रदेशच्या दिशेने निघाले हाेते. देवलापार पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ बाेरची रायफल आणि कार जप्त केली. शिवाय, पुढील तपासासाठी तिघांनाही चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन केल्याची माहिती देवलापारचे ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली. या कारवाईमुळे आराेपींकडून नजीकच्या काळात हाेणाऱ्या घटनांना प्रतिबंध लावला आहे.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटक