शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

वर्धा मार्गावर मेट्रोमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: October 30, 2016 02:46 IST

वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून

नागरिक त्रस्त : अधिकारी झोपेत, रोजच उद््भवते स्थितीनागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून यावर तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. गुरुवार आणि शुक्रवारी रात्री नागपूर विमानतळासमोर वर्धा मार्गावर जवळपास अडीच तास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे शेकडो वाहने गर्दीत अडकली. सोबतच दोन अ‍ॅम्ब्युलन्स गर्दीत फसल्या. गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीही मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी आणि वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)वाहनचालक निरुत्तररात्री कोंडीत फसलेले लोक त्रस्त होते. कोंडी का झाली आणि केव्हा दूर होईल, यावर लोक निरुत्तर होते. सदर प्रतिनिधी कोंडीत फसला होता. लोकांनी सांगितले की, गेल्या ३५ मिनिटांपासून वाहने जागीच उभी आहेत. काही मिनिटानंतर विचारपूस केली असता चिंचभुवनकडून येणाऱ्या मार्गावर एका बाजूला मोठी ट्रॉली फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून त्यामुळे चिंचभुवनकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले. काही वेळानंतर कोंडीत फसलेल्या काही युवकांनी साईट अधिकारी वा अभियंता कुठे आहे, अशी विचारपूस केली. बराच वेळ शोध न लागल्याने युवकांनी स्वत: शोधमोहीम सुरू केली. कोंडी सोडवून अन्य मार्गाने वाहतूक सुरू करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला. शोधमोहिमेनंतरही अधिकारी वा अभियंता सापडला नाही. अधिकारी झोपले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. सदर प्रतिनिधीने साईट अभियंत्याचा मोबाईल क्रमांक विचारला, पण कुणीही दिला नाही. क्रमांक माहीत नसल्याचे सर्वांनी उत्तर दिले. वाहतुकीची कोंडी झाल्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याकडे वॉकीटॉकी नव्हती. प्रतिनिधीने अधिकाऱ्याला मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाऱ्याचा मोबाईल बंद होता. त्या अधिकाऱ्याला एसएमएससुद्धा केला, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या अधिकाऱ्याकडून कुठलाही मॅसेज आला नाही वा कोंडी का झाली, याची माहिती मेट्रो रेल्वेतर्फे देण्यात आली नाही. वर्धा मार्गावर होणारी कोंडी नेहमीचवर्धा मार्गावर दररोजच वाहतुकीची कोंडी होते. मेट्रो रेल्वे कामावरील मोठ्या मशीन्स मार्गाच्या मध्यभागी उभ्या करण्यात येत असल्यामुळे वाहतूक जाम होते. अशा स्थितीत वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात केले पाहिजे. कोंडी कुठपर्यंत झाली आहे आणि ती कशी सोडविता येईल, यासाठी त्यांच्याकडे वॉकीटॉकी असली पाहिजे. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. रात्री मेट्रो रेल्वे अधिकारी या ठिकाणी तैनात असला पाहिजे. पण याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले. त्रासाबद्दल खेदयासंदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे उपमहाव्यवस्थापक (समन्वय व जनसंपर्क) शिरीष आपटे यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे नागपूरकरांना कुठलीही असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.