शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीला जलप्रदूषणाचा धोका

By admin | Updated: June 5, 2016 02:56 IST

उपराजधानी तलावांचे शहर आहे. येथे १३ मोठे तलाव आहेत, शिवाय ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र आज ते सर्व तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून,

पर्यावरण जीवनाचा आधार : तलावांचे आरोग्य बिघडले नागपूर : उपराजधानी तलावांचे शहर आहे. येथे १३ मोठे तलाव आहेत, शिवाय ते पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. मात्र आज ते सर्व तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकले असून, जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ‘जल’ हा सुद्धा पर्यावरणाचा प्रमुख घटक आहे. नागपूरपासुन काहीच अंतरावर कन्हान व पेंच नदी आहे, शिवाय पश्चिमेला वर्धा आणि पूर्वेला वैनगंगा आहे. पर्यावरणाचा विचार डोक्यात येताच या प्रमुख नद्यांमधील जलप्रदूषणाचा प्रश्न पुढे उभा ठाकतो. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने जलप्रदूषण रोखण्याचा संकल्प घेतला पाहिजे. पर्यावरण संरक्षणाचा हाच सर्वात सोपा मार्ग आहे. पर्यावरण हा जीवनाचा आधार आहे. जैवविविधता मानवाला अन्न, पाणी व निवारा अशा जीवनावश्यक वस्तू पुरविते. जैवविविधतेचा नाश हा पर्यावरणीय परिसंस्थांची उत्पादकता कमी करतो. त्यामुळे जैवविविधतेचे संगोपन करणे आवश्यक आहे. वृक्ष जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. मनुष्यासह विविध सजीवांच्या सुरक्षेसाठी आज वृक्षारोपण ही प्राथमिक गरज आहे. हिरव्यागार झाडांमुळे शहरात चैतन्य निर्माण होते. सध्या देशातील बहुतांश मोठी शहरे वायू प्रदूषणाचा सामना करीत आहे. मात्र त्याचवेळी उपराजधानी वनराईच्या कुशीत आजही सुरक्षित आहे. नागपुरातील वायू प्रदूषणाने अद्यापही धोक्याची सीमा ओलांडलेली नाही. ही नागपूरकरांसाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. परंतु मागील दशकभरापासून नागपुरातही झपाट्याने औद्योगिकीकरण वाढत आहे. शिवाय शहरीकरणाच्या नावाखाली झाडांची सर्रास कटाई केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत शहरातील सुमारे तीन हजार झाडांची कत्तल झाली आहे. त्याचा पर्यावरणावर थेट परिणाम होऊ लागला आहे. सध्याची जीवनशैली पर्यावरणाला बाधक ठरत आहे. उत्पादन व उपभोगाच्या पद्घतीमुळे पाणी, हवा व जमिनींचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.(प्रतिनिधी)झाडे तोडू नका! विकासाच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे; मात्र हे चुकीचे आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन बिघडत आहे. कधी काळी नागपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर होते. परंतु आज शहर केवळ नावापुरते हिरवेगार राहिले आहे. मागील काही वर्षांत हजारो झाडांची कत्तल झाली आहे. याचा पर्यावरणावर थेट परिणाम होत आहे. तरी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूरकरांनी वृक्षतोड न करण्याची शपथ घेण्याची गरज आहे. शहरात कार्बन उत्सर्जन वाढत असल्याने दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. भविष्यातील हा धोका टाळण्याची आम्ही वृक्षतोड थांबवून वृक्षलागवड केली पाहिजे. त्याचवेळी शहरातील जलस्रोतांचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घ्यावा. - डॉ. कविता रतन, पर्यावरण तज्ज्ञ.वायू प्रदूषण वाढते! उपराजधानीत वायू प्रदूषण वाढत आहे. मात्र देशातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत आजही नागपूर सुरक्षित आहे. नागपूर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हिरवेगार शहर आहे. त्याचा शहराला प्रचंड फायदा होत आहे. दुसरीकडे आजही शहरातील वाहनांची संख्या आटोक्यात आहे. दिल्ली, मुंबई व कोलकाता शहराच्या तुलनेत नागपुरात वाहनांची संख्या फारच कमी आहे. शिवाय उपराजधानीच्या सभोवताल कारखानेसुद्धा कमी आहेत. सर्वाधिक प्रदूषण वाहने व कारखान्यांमुळे होते. मात्र असे असले तरी भविष्यातील धोका टाळण्यासाठी नागपूरकरांनी आतापासूनच प्रदूषणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. जलप्रदूषणाबाबतसुद्धा नागपूर सुरक्षित आहे. उपराजधानीला प्रामुख्याने पेंच प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, शिवाय हा प्रकल्प जंगलात असून पूर्णत: प्रदूषणमुक्त आहे. -पवन लाभसेटवार,पर्यावरण तज्ज्ञ