शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 11:04 IST

२०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून, खरीप हंगाम २०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा ही कीड शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते, असे विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी म्हटले आहे.गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून, कापूस उत्पादनातील सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे (मार्केट यार्ड), गोडाऊन, जिनिंग, प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर, रोटावेटर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल.पाच ते सहा महिने कापूसविरहित शेत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात येते. त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. कपाशीचा हंगाम संपण्याच्या वेळी शेतातील कीड रोगग्रस्त पाने, पाते, फुले, बोंडामध्ये असलेल्या बोंडअळीच्या विविध अवस्था नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत.पऱ्हाटी काढल्यानंतर शक्यतो दिवसाच नांगरणी करण्याचा सल्लाकपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये किडीची सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करून बांधावर ठेवू नये. कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पऱ्हाटी शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा, इंधन ब्रिकेट्स तयार करणाऱ्या कारखान्यांना द्याव्यात. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरणी हिवाळ्यातच करावी. त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडीचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. शक्यतो दिवसा नांगरणी केल्यास किडीचे नैसर्गिक शत्रू चिमण्या, कावळे, बगळे याद्वारे नियंत्रण होते.

टॅग्स :cottonकापूस