शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा धोका वाढला, दोन दिवसांत ७९४ ठिकाणी आढळली अळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:08 IST

१६,०२१ घरांचे सर्वेक्षण : तापाचे २०१ रुग्ण आढळले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. ...

१६,०२१ घरांचे सर्वेक्षण : तापाचे २०१ रुग्ण आढळले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. दोन दिवसांत १६०२१ घरांची तपासणी करण्यात आली. यात ७९४ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. यामुळे डेंग्यूचा धोका वाढला आहे.

मंगळवारी ८०४२ घरांची तपासणी केली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली, तर बुधवारी ७९७९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४१६ घरांत अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये मंगळवारी तापाचे ९६ रुग्ण आढळून आले तर बुधवारी १०३ रुग्ण आढळून आले. २५० जणांच्या रक्ताचे नमुने तर १३ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. बुधवारी सर्वेक्षणादरम्यान ३०२९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ३८१ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे २९४ कुलर्स रिकामी करण्यात आले तर ९७७ कुलर्समध्ये १ टक्के तर १५५२ कुलर्समध्ये २ टक्के टेमिफॉस सोल्यूशन टाकण्यात आले. २०६ कुलर्समध्ये गप्पी मासेसुद्धा टाकण्यात आले.

गुरुवारी सतरंजीपुरा झोन येथे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी उपाययोजनेचा आढावा घेतला. आयुक्तांनी जास्तीत जास्त नागरिकांच्या घरांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

लक्ष्मीनगर झोनमध्ये आरोग्य समिती सभापती महेश महाजन, झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. नेहरूनगर झोनमध्ये विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, झोन सभापती स्नेहल बिहारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याद्वारे आढावा घेण्यात आला. लकडगंज झोनमध्ये झोन सभापती मनीषा अतकरे यांनी सहायक आयुक्त साधना पाटील यांच्यासमवेत डेंग्यू रुग्ण आढळलेल्या परिसराला भेट देऊन पाहणी केली व उपाययोजनांचा आढावा घेतला.

...

पावसामुळे डासांची पैदास वाढली

पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे डासोत्पत्ती होणार नाही याचीही प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील कुंड्या, कुलरची टाकी, भांडी व जेथे पाणी साचू शकते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय ताप, उलट्या, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ ही व अशी अन्य डेंग्यूसदृश लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

...