शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

- तर होऊ शकतो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:44 IST

देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये गणना होत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय जर्जर झाली असून, .....

ठळक मुद्देकृषी महाविद्यालयाची इमारत जर्जरावस्थेतशेकडो विद्यार्थी घेतात शिक्षणइंग्रजांनी ठरविले होते धोकादायकमहाविद्यालय प्रशासनाने सतर्क होण्याची गरज

आशिष दुबे /विशाल महाकाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये गणना होत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय जर्जर झाली असून, ती कधीही पडू शकते. १५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीचे आयुष्यच आता संपले असल्याची जाणीव असूनदेखील महाविद्यालय प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. शेकडो कर्मचारी व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून या इमारतीचा उपयोग सुरूच आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, १५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीमध्ये १९०६ साली महाविद्यालयाची स्थापना झाली. या इमारतीचा ‘रेकॉर्ड’ आतादेखील ब्रिटिश अधिकाºयांजवळ आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला पत्रदेखील पाठविले होते. या इमारतीचे आयुष्य आता संपले असून ती कधीही पडू शकते, असा स्पष्ट इशाराच यात देण्यात आला होता. मात्र या पत्राला अधिकाºयांनी गंभीरतेने घेतले नाही. विद्यार्थी व कर्मचाºयांच्या जीवाचे मोल लक्षात न घेता बेजबाबदार भूमिका प्रशासनाने घेतली आहे.‘हेरिटेज’ इमारतीचा दर्जाकृषी महाविद्यालयाच्या या इमारतीला ‘हेरिटेज’ इमारतीचा दर्जा आहे. मात्र तरीदेखील या इमारतीचे संवर्धन व्हावे, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळेच इमारतीची अवस्था वाईट झाली आहे. ‘हेरिटेज’ इमारत असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असा दावा महाविद्यालय प्रशासनातील अधिकाºयांनी केला आहे. मात्र त्यांनी याची माहिती राज्य सरकार व संबंधित विभागाला दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अधिकारी म्हणतात, माहितीच नाहीयासंबंधात इमारतीचे स्थावर अधिकार डॉ.खवले व डॉ.विलास तेलगोटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. इमारतीची जबाबदारी आपल्याकडे येत नसल्याचे डॉ.खवले यांनी स्पष्ट केले. तर आपण स्थावर अधिकारी असलो तरी केवळ पाणी व विजेची देयके भरण्याचेच काम करतो. इमारतीची जबाबदारी अभियांत्रिकी विभागाची आहे, असे डॉ.तेलगोटे यांनी सांगितले. दोन्ही अधिकाºयांनी माहिती देण्यास नकार दिल्यानंतर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पर्लावार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जी माहिती घ्यायची आहे ती जनसंपर्क अधिकाºयांकडून घ्या, असे सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला.छत, भिंतींची अवस्था खराबइमारतीचे वास्तव लक्षात येऊ नये, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने तळमजल्यावर रंगकाम केले आहे. मात्र नीट पाहिले असता इमारतीचे छत व भिंती खराब अवस्थेत असल्याचे लक्षात येते. इमारतीचा ‘टॉवर’ व लागून असलेले छताचे पोपडे पडण्यास सुरुवात झाली आहे. भिंतींनादेखील तडे गेले असून, दोन भागांत विभागल्या गेली आहे.