शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

लुटमार, छेडछाड करणाऱ्यांंविरुद्ध जनआक्रोश

By admin | Updated: September 27, 2016 03:24 IST

महिला घरात एकटी असल्याचे पाहून लुटमार करून पळून जाणाऱ्या एका आरोपीची गायत्रीनगर, हजारीपहाड

नागपूर : महिला घरात एकटी असल्याचे पाहून लुटमार करून पळून जाणाऱ्या एका आरोपीची गायत्रीनगर, हजारीपहाड परिसरातील नागरिकांनी बेदम धुलाई केली. त्याचे हातपाय बांधून नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. मुकेश शिवानंद पासवान (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. तो याच भागातील आशा बालवाडीजवळ राहतो. संतप्त नागरिकांकडून आरोपीची धुलाई होण्याची दुसरी एक घटना रविवारी रात्री जरीपटक्यात घडली. या दोन्ही घटनांमुळे छेडछाड, लुटमार करणारांविरुद्धचा नागरिकांच्या मनातील आक्रोश अधोरेखित झाला आहे. पती बाहेर गेल्यामुळे रविवारी दुपारी २.३० वाजता वैशाली दत्ता खोडे (वय ३३, रा. गायत्रीनगर) आपल्या मुलासह घरात बसून होत्या. तेवढ्यात आरोपी मुकेश दारावर आला. त्याने वैशाली यांना पिण्याचे पाणी मागितले. तो ओळखीचा असल्याने वैशालीने मुलाला खाली ठेवून आरोपीला पिण्याचे पाणी दिले. घरात कुणीच नसल्याची खात्री पटल्याने आरोपीने एका हाताने वैशालीचे तोंड दाबले आणि दुसऱ्या हाताने तिचे ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. आरोपीने कंपाउंड वॉलवरून उडी मारून पळ काढला. तत्पूर्वीच वैशालीने आरडाओरड केल्याने बाजूच्या लोकांनी त्याला पकडले. हातपाय बांधून त्याची बेदम धुलाई केली आणि गिट्टीखदान पोलिसांना कळविले. ठाणेदार राजेंद्र निकम यांनी लगेच पोलिसांचा ताफा पाठविला. उपनिरीक्षक डी. ए. देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांंनी आरोपी मुकेशला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी खासगी वाहनचालक म्हणून आधी वैशालीच्या पतीसह काम करीत होता. (प्रतिनिधी) जरीपटक्यात मजनूची धुलाई दुसरी घटना रविवारी रात्री जरीपटक्यात घडली. येथील एक तरुणी (वय २५) एका खासगी संस्थेत काम करते. सुटी असल्यामुळे रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास आपल्या बहिणीसह साई मंदिरातून दर्शन करून परतली. आईवडील, भावाशी गप्पा केल्यानंतर ती पहिल्या माळ््यावरील आपल्या शयनकक्षात गेली. तेथे युवराज पवार (वय २१, रा. हसनबाग) हा आरोपी आधीच दडून बसला होता. त्याने तरुणीसोबत लज्जास्पद वर्तन केले. या अनपेक्षित प्रकारामुळे भांबावलेल्या तरुणीने आरडाओरड केली. त्यामुळे घरची मंडळी आणि शेजाऱ्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवराजला पकडले. घटना कळताच संतप्त नागरिकांनी युवराजची बेदम धुलाई केली. माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी युवराजला संतप्त नागरिकांच्या तावडीतून सोडवले. त्याच्यावर मेयोत प्रथमोपचार करून घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के. डी. वाघ यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.