शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्र-कुलगुरूंच्या फाईल्सवर उंदीरमामांचा डोळा

By admin | Updated: July 1, 2016 02:59 IST

कुठल्याही विद्यापीठाचे प्र-कुलगुरूचे पद म्हटले म्हणजे दररोज विविध आव्हानांना सामोरे जाणे आलेच.

नागपूर : कुठल्याही विद्यापीठाचे प्र-कुलगुरूचे पद म्हटले म्हणजे दररोज विविध आव्हानांना सामोरे जाणे आलेच. कधी विद्यार्थ्यांचा मोर्चा, कधी परीक्षा विभागातील अडचणी, तर कधी अंतर्गत राजकारण पिच्छा असतेच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना इतर बाबींसोबतच चिंता आहे ती त्यांच्या कक्षातील फाईल्सची. या फाईल्सवर कुणी विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी नव्हे तर चक्क उंदरांचा डोळा आहे. या कक्षात उंदरांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून येथे येणारे पाहुणे अनेकदा हा प्र-कुलगुरूंचा कक्ष आहे की उंदरांचा, असा गमतीत प्रश्न विचारतात.विद्यापीठाच्या परीक्षांची जबाबदारी सांभाळणारे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कक्षात उंदीर व घुशींचे साम्राज्य आहे. गंभीर विषयावर एखादी बैठक सुरू असताना किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेत असताना पायाखाली धुमाकूळ घालणाऱ्या उंदरांचा त्यांना दररोज सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. डॉ. प्रमोद येवले यांचा कक्ष ‘हेरिटेज’ दर्जा असलेल्या इमारतीत आहे. हा कक्ष बराच जुना असून नियमांमुळे त्यात फारसे बदल करणे शक्य नाही. वर्षभराअगोदर ते रुजू झाल्यानंतर थोडीबहुत डागडुजी करण्यात आली होती. परंतु येथे अगोदरपासूनच उंदीर, घुशींचे वास्तव्य आहे. प्र-कुलगुरू कक्षात असतानादेखील उंदीर-घुशी न घाबरता कक्षात मुक्तसंचार करताना दिसून येतात. त्यांच्या कक्षात परीक्षा विभागातील महत्त्वाची कागदपत्रे, पीएचडी उमेदवारांच्या फाईल्स, गोपनीय दस्तऐवज असतात. उंदरांकडून त्या कधीही कुरतडल्या जाण्याची भीती आहे. अनेकदा तर हे उंदीर प्र-कुलगुरू व त्यांच्या कक्षात आलेल्या पाहुण्यांच्या पायावरूनदेखील जातात. (प्रतिनिधी)नवीन कक्षाची युद्धस्तरावर निर्मितीउंदरांमुळे त्रास होतोच. परंतु फाईल्स सांभाळून ठेवण्याकडे आमचा भर असतो. संबंधित कक्ष बदलून नवीन कक्ष देण्यात यावा, अशी विनंती प्रशासनाकडे केली असल्याची माहिती प्र-कुलगुरूंनी दिली. विद्यापीठाच्या मुख्य कक्षात प्र-कुलगुरूंच्या नवीन कक्षाचे बांधकाम सुरू आहे. हा कक्ष लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी युद्धस्तरावर काम करण्यात येत आहे. लवकरच हा कक्ष तयार होईल, असे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी सांगितले.