कामठी रोड, दाभा आदर्श लोकेशन : बँकांतर्फे कमी व्याजदरात कर्जनागपूर : नोटाबंदीचा फटका बसल्यानंतर आता इच्छुक लोकांसाठी उत्सव साजरा करण्याची वेळ आहे. स्वस्त गृहकर्जामुळे भारतात हाऊसिंग क्षेत्रात उत्साह संचारला आहे. हाऊसिंग क्षेत्रात सर्वत्र मागणी वाढली आहे, असे मत ‘जेएलएल’चे मुख्य कार्यान्वयन अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संचालक रमेश नायर यांनी व्यक्त केले आहे. त्यांची कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात देशात आघाडीची आणि सर्वात मोठी व्यावसायिक सेवा फर्म आहे. त्यांच्यानुसार स्वस्त गृहकर्ज घर खरेदीचे कारण नाही. पण आता घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी हे कारण अत्यावश्यक बनले आहे. त्यांनी सांगितले की, बँका आता मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना घर खरेदी करणे सुलभ झाले आहे. कमी व्याजदरात कर्ज मिळाल्यास किफायत घरांच्या मागणीत नक्कीच वाढ होणार आहे. अशास्थितीत नागपुरात घर खरेदीची हीच योग्य वेळ आहे. गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदा घर खरेदीसाठी शुभ वेळ आली आहे. स्वस्त गृहकर्ज, हे त्याचे मुख्य कारण आहे. नागपुरात घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सर्वोत्तम गुंतवणुकीचे ठिकाण आहे. घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने १ जानेवारी २०१७ ला एमसीएलआर ८.९ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यानुसार पूर्वी ९.१ टक्क्यांवर असलेले गृहकर्जाचे व्याजदर आता ८.६ टक्क्यांवर आले आहेत. एसबीआयचे या दशकातील सर्वात कमी व्याजदर आहेत.याशिवाय युनियन बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय बँक, पंजाब नॅशनल बँक आदींनीही गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. पंतप्रधान निवासी योेजनेत गरीब व सामान्यांना २ लाख २० हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यांना १५ वर्षांच्या कालावधीसाठी कमी व्याजदात घर खरेदीची संधी आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढणार आहे. विश्वसनीय बिल्डर्स, विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि आसपासचे वातावरण, शाळा व सर्वोत्तम गुणवत्तेचे प्रकल्प नागपुरात आहेत. घर खरेदी आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने मनपा हद्दीअंतर्गत कामठी रोड आणि दाभा हे सर्वोत्तम लोकेशन आहे.(वा.प्र.)
नागपुरात घर खरेदीची हीच योग्य वेळ
By admin | Updated: February 3, 2017 02:33 IST