शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

नोटांसाठी दाही दिशा !

By admin | Updated: November 16, 2016 02:29 IST

५०० आणि १०००च्या चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला मनाई केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर संकटात आले आहेत.

शेतकरी संकटात : जिल्हा बँकेची कोंडी : पतसंस्थाही अडचणीत ५०० आणि १०००च्या चलनातून बंद झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला मनाई केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर संकटात आले आहेत. या आदेशामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. घरातील जुन्या नोटा कुठे ठेवायच्या, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. इकडे पतसंस्थांमध्ये ‘चलनकोंडी’ करण्यात आल्याने नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील १००७ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत.जिल्ह्याची अर्थव्यवस्था कोलमडणारमोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूर जिल्हा बँकेला ५०० व १००० हजार रुपये न स्वीकारण्याच्या आदेशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडणार आहे. घरातील जुन्या नोटा कुठे ठेवायच्या, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये जुन्या नोटांचे व्यवहार बंद झाल्यामुळे शेतकरी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत आहेत. हा निर्णय परत न घेतल्यास शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास उडणार आहे. या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी लक्ष घालून निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ६०%शेतकरी जिल्हा बँकेचे सभासदएकूण लोकसंख्यपैकी ६० टक्के शेतकरी गावात राहतात. ते जिल्हा बँकेचे सभासद आहेत. गावागावांमध्ये अजूनही राष्ट्रीयकृत बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत. त्यांच्यासमोर जिल्हा बँकेशिवाय दुसरा पर्याय नाही. खत खरेदी वा मजुराला पैसे देण्याचा व्यवहार शेतकरी रोखीने करतो. दुसरीकडे राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांमध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. या बँकांमध्ये शेतकऱ्यांचे खाते नसल्यामुळे ते त्या बँकांमध्ये जात नाहीत. सरकारने रक्कम भरण्यास आणि काढण्यास ३० डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यामुळे त्यांनी पैसे भरण्यास घाई केली नाही. दुसरी बाजू पाहिल्यास जिल्हा बँकेत मोठ्या लोकांचे खाते नाहीत. शेतकऱ्यांसमोर दुसऱ्या बँकेचा पर्याय नसल्यामुळे तो अडचणीत सापडला असून चिंताग्रस्त आहे. जुना नोटा स्वीकारण्यास मनाई करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने मागे घ्यावा, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.जुन्या नोटांनी कर्ज कसे भरणार?रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने मंगळवारीपासून जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. सकाळपासून अनेक शेतकरी परत गेल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेत ८५८ कोटींच्या ठेवी असून ६५७ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. सोमवारपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास दोन कोटींचे कर्ज भरले आणि १० कोटी जुन्या नोटांचा भरणा केला. पण मनाई आदेशामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पण शेतकऱ्यांना मार्चपर्यंत बिनाव्याजी कर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज भरता येईल, अशी माहिती बँकेचे अधिकारी सतीश निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली. शेतकरी चिंताग्रस्तरिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळे शेतकरी व शेतमजूर अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्याच्या घरी क्षमतेनुसार ३० ते ५० हजारांपर्यंत रक्कम असते. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन विकले आहेत. त्यांच्याकडे रोख रक्कम आहे. त्या रकमेचे काय करायचे, हा मोठा प्रश्न आहे. सरकारचा निर्णय चुकीचा आहे. रब्बी हंगाम सुरू आहे. मजुराला देण्यासाठी त्यांच्याकडे नव्या नोटा नाहीत. त्यामुळे मजुरांनीही कामाकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी शेती बुडण्याची भीती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आदेशाचा फटका बसला आहे. - डॉ.बबनराव तायवाडे प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस