शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बंडाचा झेंडा कायम

By admin | Updated: February 8, 2017 03:00 IST

पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर, मनधरणी केल्यानंतर काही प्रभागात बंडोबा शेवटी थंडोबा झाले.

मैंद यांचे भाजपाविरोधात ‘पॅनल’ : जोशी, रिसालदार, पातूरकर, सेनाड रिंगणातच नागपूर : पक्षाच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतर, मनधरणी केल्यानंतर काही प्रभागात बंडोबा शेवटी थंडोबा झाले. उमेदवारी मागे घेतली. मात्र, काहींनी त्यानंतरही बंडाचा झेंडा कायम ठेवत पक्षातीलच उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. निवडणुकीत या बंडोबांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल. एकीकडे ‘डॅमेज कंट्रोल’मध्ये यश आले असतानाच प्रभाग १५ मध्ये मात्र पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशाखा जोशी यांनी बंड केले असतानाच विद्यमान नगरसेविका विशाखा मैंद यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. पक्षनेत्यांच्या सूचना झुगारून त्यांनी प्रभाग-१५ मध्ये ‘पॅनल’ उभारले आहे. या ‘पॅनल’मध्ये राजेश जरगर, त्रिवेणी तिवारी व अ‍ॅड.प्रदीप अग्रवाल यांचा समावेश आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता हा निर्णय आम्ही घेतला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळालीच पाहिजे. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी आमदारांचेदेखील फोन आले. मात्र आम्ही निर्धारावर कायम आहो, असे मैंद यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संघ परिवारातीलच चार जणांनी मात्र अर्ज मागे घेण्यास नकार देत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. यात प्रभाग १५ मधून शिवसेनेच्या तिकिटावर लढत असलेल्या विशाखा जोशी, प्रभाग १६ मधून अपक्ष उतरलेले प्रसन्न पातुरकर, प्रभाग १९ मधून अपक्ष लढणारे श्रीपाद रिसालदार व प्रभाग ३१ मधून बसपाच्या तिकिटावर लढणारे अतुल सेनाड यांचा समावेश आहे. श्रीपाद रिसालदार यांनी प्रभाग-१९ मध्ये सुनील श्रीवास यांच्या सोबतीने ‘पॅनल’ तयार केले आहे. प्रभाग १२ मध्ये भाजपा व काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांना काँग्रेसने प्रभाग १४ मध्ये तिकीट दिल्यानंतरही प्रभाग १२ मध्ये त्यांच्या मातोश्री नगरसेविका मीना चौधरी या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी तर एकत्र येत पॅनलच तयार केले आहे. भाजपच्या मातंग समाज सेलच्या जिल्हाध्यक्ष उषा अडागळे (अनुसूचित जाती महिला), युवा मोर्चाच्या पिंकू मारुती वाळवे (जमाती महिला), प्रभाग १२ चे सहसंयोजक तसेच जुन्या प्रभाग २३ चे दोनदा अध्यक्ष व वॉर्ड १४ चे अध्यक्ष राहिलेले ज्ञानेश्वर साव (ओबीसी ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारीपहाड नगरसेवा प्रमुख व भाजपाचे बूथ प्रमुख, तीन वेळचे मंडळ उपाध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम, बजरंग दल आदींमध्ये काम केलेले शिवपाल सिंह (सर्वसाधारण) यांनी भाजपा विरोधात दंड थोपटले आहेत. सर्वसाधारण प्रभागात पश्चिम नागपूरचे माजी महामंत्री अशोक डोर्लीकर यांनी देखील अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. डोर्लीकर यांनी दोन महिन्यांपूर्वीच भाजपला तसा इशारा दिला होता. प्रभाग ११ मध्ये नगरसेवक अरुण डवरे हे काँग्रेसचे तिकीट कटल्यामुळे तर भाजपचे पदाधिकारी नामदेव भोरकर हे देखील अपक्ष म्हणून लढत आहेत. काँग्रेसच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष राम कळंबे यांच्या पत्नी सनिता या बसपाकडून रिंगणात आहेत. नगरसेवक महेंद्र बोरकर हे प्रभाग १ मधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढत आहेत.(प्रतिनिधी)