शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

महसूल लाखांचा, वेतन कोटींमध्ये

By admin | Updated: June 19, 2017 02:05 IST

सध्या प्रसारमाध्यमांमध्ये २४ बाय ७ चे युग असताना दूरदर्शनचा प्रवास मात्र अद्यापही संथगतीनेच सुरू आहे.

‘दूरदर्शन’ केंद्र ठरतेय पांढरा हत्ती : दिवसभरात केवळ एक तास प्रसारणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या प्रसारमाध्यमांमध्ये २४ बाय ७ चे युग असताना दूरदर्शनचा प्रवास मात्र अद्यापही संथगतीनेच सुरू आहे. नागपूर दूरदर्शनचे दिवसभरात केवळ एक तासच प्रसारण करण्यात येते. विशेष म्हणजे, २०१५-१६ मध्ये वर्षभरात दूरदर्शनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनापोटीच सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र वर्षभरात केंद्राला प्राप्त होणाऱ्या महसुलाचा आकडा जवळपास साडेसात लाख इतकाच होता. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर दूरदर्शन केंद्राकडे विचारणा केली होती. नागपूर दूरदर्शन केंद्राद्वारे निर्मित कार्यक्रमांचे प्रसारण केव्हा होते, येथील स्टुडिओची कार्यक्रमनिर्मिती क्षमता किती आहे, नागपूर केंद्राच्या तंत्रज्ञानाची प्रसारणक्षमता किती आहे, केंद्रापासून प्रसार भारतीला मिळणारे वार्षिक उत्पन्न, मंजूर व रिक्त पदे तसेच वेतन-भत्त्यांवरील एकूण वार्षिक खर्च इत्यादीबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, आॅगस्ट २०१६ मध्ये नागपूर दूरदर्शन केंद्रातर्फे सायंकाळी ६ ते ७ या कालावधीत कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येते. हे कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित करून प्रसारित करण्यात येतात. या केंद्राची कार्यक्रमनिर्मिती क्षमता प्रति दिन दोन कार्यक्रम इतकी असून, त्याचा पूर्णपणे उपयोग करण्यात येतो, असा दावा केंद्रातर्फे करण्यात आला आहे. केंद्रात १०६ मंजूर पदे आहेत. यापैकी २७ पदे रिक्त आहेत. २०१५-१६ या कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यापोटी ५ कोटी ९७ लाख ५४ हजार ५३२ रुपयांचा खर्च झाला. मात्र या कालावधीत प्रसारभारतीला दूरदर्शन केंद्रापासून अवघा ७ लाख ४७ हजार २५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यात सुमारे साडेतीन लाख रुपये तर विविध लिलावातून मिळाले होते.‘आरएनयू’च उपलब्ध नाहीनागपूर दूरदर्शन केंद्र हे विदर्भातील महत्त्वाचे केंद्र मानण्यात येते. मात्र प्रत्यक्षात या केंद्रावरून बातम्यांचे प्रसारणच होत नाही. या केंद्रात ‘आरएनयू’च (रिजनल न्यूज युनिट) उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसारणाची सोय नाही.