शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीचे पैसे परत करा

By admin | Updated: July 31, 2014 01:06 IST

ठगबाज समीर जोशी आणि प्रशांत वासनकर याच्या कंपनीने फसवणूक केलेल्या १०० पेक्षा जास्त पीडित गुंतवणूकदारांनी न्याय्य मागण्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तासभर निदर्शने केली.

समितीची पोलीस आयुक्त मुख्यालयासमोर निदर्शने नागपूर : ठगबाज समीर जोशी आणि प्रशांत वासनकर याच्या कंपनीने फसवणूक केलेल्या १०० पेक्षा जास्त पीडित गुंतवणूकदारांनी न्याय्य मागण्यांसाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर तासभर निदर्शने केली. पीडितांच्या नारेबाजीने परिसर दणाणून गेला. विविध कंपन्यांमध्ये फसलेल्या लोकांनी पीडित निवेशक संघर्ष समिती स्थापन केली आहे. पैसे परतीसाठी त्यांचा लढा सुरू आहे. समितीचे संयोजक जम्मू आनंद यांनी सांगितले, नागपूर शहर हे ठगबाज आणि गैरबँकिंग वित्तीस संस्थांची राजधानी झाले आहे. अनेक फसव्या कंपन्यांचे जाळे शहरात आहे. हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये या कंपन्यांमध्ये फसले आहे. सर्व स्तरातील लोकांना या कंपन्यांचा फटका बसला आहे. तक्रार केल्यानंतर तब्बल दोन महिने पोलीस आणि शासकीय यंत्रणा कारवाई करीत नसल्याने ठगबाजांचे फावते. यावेळी प्रमोद अग्रवाल, हरिभाऊ मंचलवार, श्रीसूर्या, वासनकर, प्रवीणे झामरे, जे.एम. फायनान्स, रविराज फायनान्स या ठगबाजांचा उल्लेख करण्यात आला. यांच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर हजारो लोक फसले नसते. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी पीडित निवेशक संघर्ष समितीची मागणी असल्याचे जम्मू आनंद यांनी सांगितले.अन्य आरोपींना लवकरच अटक होणारआर्थिक घोटाळ्यात लिप्त संचालक आणि एजंटांना लवकरच अटक करणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सक्सेना यांनी चर्चेसाठी गेलेल्या समितीच्या सदस्यांना दिली. कारवाईसाठी वेळ लागला हे सत्य असले तरीही सर्व बाजू तपासून कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात काही उणिवा राहू नयेत, यासाठी पोलीस दक्ष असल्याचे सक्सेना यांनी सांगितले.आरोपींना व्हीआयपी सुविधांचा आरोपअंबाझरी पोलीस कोठडीत प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित चौधरी या तिघांना व्हीआयपी सुविधा देण्यात येत असल्याचा आरोप पीडितांनी केला. काहींनी अनुभवही कथन केले.