शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विखुरलेल्या रिपाइंची मोट बांधण्याचा पुन्हा प्रयत्न

By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटामध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या राजकीय पक्षाची मोट बांधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाला आहे. शनिवारी रिपाइंच्या विविध

आमदार निवासात बैठक : रिपाइंच्या विविध गटांचे पदाधिकारी सहभागी नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटामध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या राजकीय पक्षाची मोट बांधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाला आहे. शनिवारी रिपाइंच्या विविध गटातील पदाधिकाऱ्यांची आमदार निवासात यासंबंधात पहिली बैठक पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया सध्या विविध गटांमध्ये विभागल्या गेली आहे. प्रत्येक गटातील नेते त्यांचाच पक्ष खरा असल्याचे सांगत असतात. रिपाइंच्या एकीकरणाचे आजवर अनेक प्रयत्न झाले; परंतु ते जास्त काळ टिकू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्वार्थी नेतृत्वामुळे रिपाइंचे ऐक्य होत नसल्याचा कांगावा करीत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी एकत्र यावे, यासाठी १० वर्षांपूर्वी प्रयत्न झाला. रिपब्लिकन आघाडीच्या स्वरूपात तो प्रयत्न यशस्वी ठरला होता. त्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडीचे तब्बल ११ नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यानंतर आघाडीचीही दोन शकले पडली आणि त्याचेच स्वतंत्र गटात रूपांतर झाले.लोकसभेच्या निवडणुकीमध्येसुद्धा रिपाइं आघाडीसंदर्भात प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विविध गटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करावी आणि निवडणुकीला सामोरे जावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शनिवारी यासंदर्भात रिपब्लिकनांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आमदार निवासात पहिली बैठक पार पडली. या बैठकीत आघाडी स्थापन करण्यावर चर्चा झाली; परंतु अंतिम निर्णय होऊ शकला नाही. शंकर मानके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत रिपाइंचे ज्येष्ठ नेते हरिदास टेंभूर्णे, दिनेश गोडघाटे, धीरज गजभिये, अमृत गजभिये, जी. वासुदेव, विश्वनाथ खांडेकर, एकनाथ ताकसांडे, प्रा. राहुल मून, नीलेश ढोके, प्रकाश कुंभे, हंसराज भांगे, अंबादास गजभिये, प्रा. अजयकुमार कांबळे, पांडुरंग बोरकर, अरुण गेडाम, डॉ. चरणजित जनबंधू, जितू जिथे, भागवत डोंगरे, डी.डी. टेंभूर्णे, अ‍ॅड. मिलिंद खोब्रागडे, भय्यासाहेब शेलारे, आर.आर. वासनिक आदींसह रिपाइं, रिपाइं (खो), रिपाइं एकतावादी, भारिप, बहुजन आधार संघ, अनुसूचित जाती-जमाती परिसंघ आदींचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)