शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्ती वेतनातून वसुली करता येणार नाही

By admin | Updated: June 15, 2017 15:42 IST

शासकीय सेवेत असताना विविध कारणांनी दिली गेलेली जादाची रक्कम निवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर.बी. मलिक यांनी मंगळवारी दिला.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शासकीय सेवेत असताना विविध कारणांनी दिली गेलेली जादाची रक्कम निवृत्ती वेतनातून वसूल करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर.बी. मलिक यांनी मंगळवारी दिला. एवढेच नव्हे तर डेअरी डेव्हलपमेंटच्या सेवानिवृत्त रेफ्रिजरेटर आॅपरेटरकडून वसूल केलेले ११ लाख रुपये दोन महिन्यात परत करण्याचे आदेशही शासनाला जारी केले आहेत.दिलीप एम. दिवाणे असे या रेफ्रिजरेटर आॅपरेटरचे नाव आहे. ते नाशिकच्या प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयात वर्ग ३ चे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. वेतन आयोगाचा लाभ देताना वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांकडून शासन काही बाबी लिहून घेते. नोकरीत असताना जादा रक्कम दिली असेल तर ती वसुलीचे अधिकार शासनाला आहेत, अशी रक्कम बिनशर्त परत करू, निवृत्ती वेतनातून ती वजा करावी आदी बाबींचा त्यात समावेश असतो. नाशिक येथील डेअरीचे रेफ्रिजरेटर आॅपरेटर दिलीप दिवाणे यांना १९९३ ला बढती देण्यात आली. परंतु त्यांनी ही बढती रद्द करण्याची विनंती केली. त्यानुसार ती रद्दही केली गेली. नंतर त्यांना शासनाच्या १९९५ च्या जीआरनुसार कालबद्ध पदोन्नती मिळाली. ही पदोन्नती मिळाल्यास व नियमित पदोन्नती नाकारल्यास पदोन्नतीचे लाभ मिळणार नाही, या शासनाच्या एका नियमाचा हवाला देत दिवाणे यांच्याकडे पदोन्नतीपोटी जादा दिलेल्या ११ लाख रुपयांच्या रकमेची रिकव्हरी काढण्यात आली. १९९४ ते २०१३ या काळातील ही रक्कम दिवाणे यांच्या निवृत्ती वेतनातून अदाही केली. या निर्णयाविरोधात दिवाणे यांनी कामगार न्यायालय व इतरत्र धाव घेतली. मात्र न्याय न मिळाल्याने त्यांनी मुंबई ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या प्रकरणात शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी म्हणून एस.टी. सूर्यवंशी या महिला अधिकाऱ्याने काम पाहिले. ‘मॅट’मध्ये या प्रकरणात बराच खल झाला. तेथे सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय चर्चिले गेले. त्याअंती दिवाणे यांच्या निवृत्ती वेतनातून सन २०१३ ला कपात केलेली ११ लाखांची रक्कम दोन महिन्यात त्यांना शासनाने परत करावी, असे आदेश ‘मॅट’ने १३ जून रोजी दिले आहे. ही रक्कम देण्यास विलंब झाल्यास वार्षिक १२ टक्के व्याज देण्याचेही आदेशात नमूद आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निर्णयांनी ‘मॅट’पुढेही संभ्रम४दोन वर्षांपूर्वी रफिक मसिह यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षानंतर शासनाला रक्कम वसुलीचे अधिकार नाही व कर्मचाऱ्यांनी शासनाला रक्कम परत देऊ नये, असा कर्मचाऱ्याला दिलासा देणारा निर्णय दिला. ४ त्यानंतर सुपर क्लास वन श्रेणीत मोडणाऱ्या दिवाणी न्यायाधीश जगदेव सिंग यांच्या प्रकरणात वसुलीचे समर्थन करताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला. एकाच न्यायालयाचे दोन निकाल असल्याने कोणता ग्राह्य धरावा असा संभ्रम ‘मॅट’मध्ये निर्माण झाला होता. ४ अखेर याचिकाकर्ते दिवाणे हे वर्ग-३ चे कर्मचारी असल्याने रफिक मसिह यांच्या खटल्यातील निर्णय उचलून धरत ‘मॅट’ने दिवाणे यांना दिलासा दिला.