शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची पेन्शनसाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 22:33 IST

Nagpur News एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता पेंशनसाठी चकरा माराव्या लागत आहे.

 नागपूर : एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता पेंशनसाठी चकरा माराव्या लागत आहे. कागदपत्रांमधील किरकोळ चुकांमुळे अनेकांना महामंडळाचे अधिकारी ईपीएफओ कार्यालयात पाठवत आहेत तर तेथील अधिकारी एसटी महामंडळाच्या कार्यालयात परत पाठवत आहे. अशा प्रकारची अनेक उदाहरणे पुढे येत असून या एकूणच प्रकारामुळे संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप होत आहे.

वाहक म्हणून सेवा देणारे एक कर्मचारी एसटीतून डिसेंबर २०२२ मध्ये निवृत्त झाले. त्यामुळे त्यांनी पेंशनसाठी संबंधित कागदपत्रांसह ईपीएफओ कार्यालयात निवेदन दिले. तेथून त्रुटी आल्याने आतापर्यंत तीन वेळा एसटी महामंडळाकडून त्यात सुधारणा करून पाठविण्यात आली. मात्र, त्यांना अद्याप पेंशन सुरू झालेली नाही. या संबंधाने निवृत्त कर्मचाऱ्याने एसटीच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणतात की सुमारे २० कर्मचाऱ्यांची पेंशन पीएफओ कार्यालयातून रोखण्यात आली आहे. तर, पीएफओचे अधिकारी यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांच्या चुकीकडे बोट दाखवत आहेत.

अनेकांचे आधार लिंक नाही

संबंधित अधिकाऱ्याची माहिती अशी आहे की निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड लिंक नाही. त्यांनी ईपीएफओ कार्यालयात जाऊन ५ आणि १० नंबरचा फॉर्म भरायला हवा. यासोबत त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कोणत्या कारणामुळे आधार लिंक झाले नाही, त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो जमा करायला हवा. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची पेंशन सुरू करण्याचे काम पीएफओचे आहे. 

पेंशन वाढविण्यासाठीही परिश्रम२०१८ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची पेंशन सुरू आहे. मात्र, ती वाढविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आधार कार्ड लिंक करने आवश्यक आहे. सोबत आणखी काही प्रक्रिया आहे. नियम आणि अटींच्या जाळ्यात कर्मचारी अडकले असून त्यामुळे त्यांना जास्त त्रास होत असल्याचे एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनroad transportरस्ते वाहतूक