शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल आयटीत शिकविणार आयआयटीचे निवृत्त प्राध्यापक

By admin | Updated: June 28, 2016 02:43 IST

महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रिपल आयटी’त (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रत्यक्ष वर्गांची सुरुवात आॅगस्ट

 आॅगस्टपासून सुरू होणार राज्यातील पहिले ‘ट्रिपल आयटी’ : प्रवेशासाठी नोंदणीस सुरुवातयोगेश पांडे ल्ल नागपूर महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रिपल आयटी’त (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रत्यक्ष वर्गांची सुरुवात आॅगस्ट महिन्यापासून होणार आहे. येथे ४० टक्के शिक्षक हे प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ किंवा ‘आयआयटी’तील निवृत्त प्राध्यापक राहणार आहेत. तर उर्वरित ६० टक्के प्राध्यापक हे मार्गदर्शक संस्था असणाऱ्या ‘व्हीएनआयटी’तील असतील. ‘ट्रिपल आयटी’त प्रवेशासाठी नोंदणीस मागील आठवड्यापासूनच सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षी येथे दोन अभ्यासक्रम राहणार असून एकूण ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्थेमध्ये संशोधनावर जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे.‘ट्रिपल आयटी’नंतर बऱ्याच उशिरा ‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट) घोषणा झाली. परंतु ‘आयआयएम’चे वर्ग मागील वर्षी सुरूदेखील झाले. त्यामुळे ‘ट्रिपल आयटी’चे वर्ग कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ‘ट्रिपल आयटी’च्या तात्पुरत्या जागेला मान्यता दिली व त्यानंतर प्रवेशासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली. ‘आरटीटीसी’ (रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर) येथे संस्थेचे वर्ग होणार आहेत.‘ट्रिपल आयटी’त पहिल्या वर्षात ‘बीटेक’ अभ्यासक्रमाच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन’ आणि ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ या दोन शाखा सुरू होतील व प्रवेशक्षमता प्रतिशाखा ४० असणार आहे. ‘ट्रिपल आयटी’मध्ये केंद्र शासनाच्या ‘जोसा’तर्फे (जॉईन्ट सीट अलॉकेशन आॅथोरिटी) ‘सीएसएबी’च्या (सेंट्रल सीट अलॉकेशन बोर्ड) माध्यमातून प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी नोंदणीस २४ जूनपासून सुरुवात झाली आहे.‘ट्रिपल आयटी’त शिक्षणाचा दर्जा सुरुवातीपासूनच उत्तम राखण्यावर भर राहणार आहे. यंदा हे पहिलेच वर्ष असल्याने कायमस्वरुपी प्राध्यापकांची नियुक्ती झालेली नाही. परंतु कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘व्हीएनआयटी’तील प्राध्यापकदेखील शिकविणार आहेत. याशिवाय ‘आयआयटी’ती निवृत्त प्राध्यापकदेखील शिकविण्यासाठी येतील, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक व ‘ट्रिपल आयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य सचिव गुलाबराव ठाकरे यांनी दिली.विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री इंटर्नशिप’ अनिवार्य४‘ट्रिपल आयटी’च्या माध्यमातून विद्यार्थी संशोधन व उद्योग जगताशी जुळले जावे असा प्रयत्न राहणार आहे. त्यानुसार अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प देण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री इंटर्नशीप’ अनिवार्य राहणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना एका पूर्ण सत्रात प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात जाऊन प्रकल्प पूर्ण करावा लागणार आहे.संकेतस्थळ झाले सुरू४नागपूरच्या ‘ट्रिपल आयटी’बाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष संकेतस्थळदेखील सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया तसेच संस्थेबाबत इत्थंंभूत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.