शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

निकालाचे तीन तेरा

By admin | Updated: February 1, 2016 02:40 IST

परीक्षा यंत्रणा सुपरफास्ट करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सहा महिन्यापूर्वी केला.

सुभेदारीने विद्यापीठ कसे चालणार ? : आधी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका द्या नागपूर : परीक्षा यंत्रणा सुपरफास्ट करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सहा महिन्यापूर्वी केला. यासाठी त्यांनी चार ‘सुभेदार’देखील नेमले. परंतु हे ‘सुभेदार’ आणि तंत्रज्ञानाची मदत असूनदेखील निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासन फेल ठरले आहे. गतिमान प्रशासनाचा संकल्प आॅफलाईन झाला असला तरी तांत्रिकदृष्ट्या जाहीर झालेल्या निकालांची गुणपत्रिका बनविण्याची तसदीदेखील अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अधिकारी विविध समारंभांमध्ये व्यस्त असताना नागपूर विभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र निकाल कधी लागणार यासाठी चातकासाठी आतुरतेने प्रतीक्षा करतो आहे. जानेवारी महिना उलटून गेला असला तरी नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल अद्याप अर्धेदेखील जाहीर झालेले नाहीच. अनेक तयार निकाल तर फाईल्समध्येच अडकले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनामुळे निकालांना वेग मिळेल, ही अपेक्षादेखील फोल ठरली आहे.नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे सव्वादोनशेच्या जवळपास निकाल जाहीर झाले आहेत. अनेक परीक्षा होऊन तर ४५ दिवस कधीच उलटून गेले आहेत. तरीदेखील निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पडताळणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक परीक्षांचे निकाल ९ जानेवारी रोजी तयार झाले आहेत. परंतु हे निकाल ना अद्याप संकेतस्थळावर ना जाहीर झालेत ना गुणपत्रिका छपाईसाठी गेल्या. हे निकाल गेल्या ३ आठवड्यांपासून केवळ फाईल्समध्येच आहेत. यासंदर्भातील ‘टीआर रिपोर्ट’देखील परीक्षा भवनात तयार आहेत. तांत्रिकदृष्ट्या निकाल जाहीर झाला असून यांची गुणपत्रिका छपाईसाठी पाठविणे क्रमप्राप्त होते. परंतु अधिकाऱ्यांनी याची तसदीच घेतली नसल्याची माहिती परीक्षा विभागातीलच सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी कुणाकडे आशेने बघायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व काही सुरळीतच चालले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कुठल्याही निकालांची गुणपत्रिका अडकलेली नाही, असेदेखील त्यांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात ९ जानेवारी रोजी तांत्रिकदृष्ट्या जाहीर झालेल्या परीक्षांचे निकाल गुणपत्रिकेवर अद्याप उमटलेलेच नाही. या ‘लेटलतिफी’मुळे परीक्षा विभागातील कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत हे विशेष.(प्रतिनिधी)