लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संस्कार भारतीच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय श्रीराम भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेत नागपूरच्या स्वरांगिनी भजनी मंडळ, अकोल्याचे रवी कसबेकर व पांढरकवडा येथील श्रुती सरोदे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ऑनलाईन स्वरूपात पार पडलेल्या या स्पर्धेत १८ वर्षाखालील मुला-मुलींचा एकल गट, १८ वर्षावरील तरुण-तरुणींचा प्रौढांचा एकल गट व भजनी मंडळांचा तिसरा गट होता. स्पर्धेत विदर्भातून २ हजार स्पर्धकांनी व भजनी समूहांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे संयोजन संस्कार भारतीचे प्रांत सहसंघटनमंत्री गजानन रानडे व सहसंयोजन चैतन्य नळकांडे, मंगेश परसाेडकर, मंगेश देऊरकर यांचे होते. समन्वयन प्रसाद पोफळी यांनी केले. प्रसिद्ध गायक गुणवंत घटवई, डॉ. जयश्री वैष्णव, अमर कुळकर्णी, अभिजित बोरीकर, चंदा जयस्वाल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना संस्कार भारती प्रांत अध्यक्ष सुरमणी कमल भोंडे, कार्याध्यक्ष सुधाकर आंबुसकर, नागपूर महानगर अध्यक्ष कांचन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
----------
अठरा वर्षाखालील एकल गट :
प्रथम - श्रुती सरोदे, पांढरकवडा
द्वितीय - इंद्राणी इंदूरकर, नागपूर
तृतीय - आयुषी देशमुख, नागपूर
उत्तेजनार्थ - स्वरदा कोरान्ने, नागपूर व सानिका बोभाटे, वर्धा
अठरा वर्षावरील एकल गट :
प्रथम - रवी कसबेकर, अकोला
द्वितीय - तेजस्विनी खोडतकर, नागपूर
तृतीय - मयूर आकळे, यवतमाळ
उत्तेजनार्थ - राखी शिपोरकर, नागपूर व वासंती पिंपळापुरे, नागपूर
भजनी मंडळ गट :
प्रथम - स्वरांगिनी भजनी मंडळ, नागपूर
द्वितीय - स्वरश्री भजनी मंडळ, नागपूर
तृतीय स्वर - स्वरअर्चना भजनी मंडळ, यवतमाळ
उत्तेजनार्थ - विठ्ठल-रुखमाई भजनी मंडळ, नागपूर व स्वरअर्चना भजनी मंडळ, अकोला.
.................