शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘एलएलबी’चा निकाल रखडला

By admin | Updated: July 25, 2014 00:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एलएलबी तृतीय वर्ष सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला आहे. बाहेरील विद्यापीठातील प्रवेश आणि इंडियन बार कौन्सिलच्या परीक्षेची मुदत संपण्यावर असूनही

नागपूर विद्यापीठ : तृतीय वर्षासाठी ‘स्कीम आॅफ मार्किंग’च नाहीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एलएलबी तृतीय वर्ष सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला आहे. बाहेरील विद्यापीठातील प्रवेश आणि इंडियन बार कौन्सिलच्या परीक्षेची मुदत संपण्यावर असूनही निकाल लागण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विधी अभ्यासमंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.मे महिन्यात एलएलबी तृतीय वर्षाच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु २ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही परीक्षेचा निकाल लागला नाही. २०१२-१३ साली विधी विद्या शाखेने ‘सीबीएस’नुसार (क्रेडिट बेस्ड सिस्टीम) नवीन अभ्यासक्रम लागू केला. हा अभ्यासक्रम लागू करताना अभ्यासमंडळाने २०११-१२ साली एलएलबी प्रथम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सीबीएस’ अभ्यासक्रमात सामवून घेतले. या विद्यार्थ्यांनी यंदाच्या उन्हाळ्यात अंतिम सत्राची परीक्षा दिली. त्यामुळे त्यांचा अंतिम निकाल हा ‘सीबीएस’नुसार देणे आवश्यक आहे. परंतु अभ्यासमंडळाने २०११-१२ सालच्या विद्यार्थ्यांना ‘सीबीएस’ अभ्यासक्रमात सामावून घेताना त्यांच्या पहिल्या दोन सेमिस्टरचे ‘सीबीएस’नुसार ‘स्कीम आॅफ मार्किंग’ केले नाही. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांची भेटदेखील घेतली. लवकरात लवकर निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी संपर्क केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याने प्रतिक्रिया देऊ शकले नाही. (प्रतिनिधी)