शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाची थकबाकी दुसऱ्या उद्योजकाकडून वसूल करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:52 IST

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मनमानी केल्यामुळे वीज विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दणका बसला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणकाउद्योजकांना दिलासा देणारा निर्वाळा

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मनमानी केल्यामुळे वीज विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दणका बसला. वीज विभागाने एमआयडीसीमधील एका भूखंडावरील आधीच्या उद्योजकाकडील थकीत वीज बिल त्यानंतरच्या उद्योजकाकडून वसूल करण्याची प्रक्रिया अवलंबली होती. उच्च न्यायालयाने या पद्धतीने वीज बिल वसूल करणे अवैध असल्याचा निर्णय दिला. एका उद्योजकाकडील वीज बिलाची थकबाकी दुसऱ्या उद्योजकाकडून वसूल करता येणार नाही. भारतीय वीज कायदा-१९१० मध्ये तशी तरतूद नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. हा निर्णय उद्योजकांना दिलासा देणारा ठरला आहे.विदर्भ फूड अ‍ॅन्ड डेअरी इंडस्ट्रिजने अकोला एमआयडीसीमधील एक भूखंड लीजवर घेऊन आईसक्रीमसह अन्य थंड पदार्थ उत्पादनाची फॅ क्टरी टाकली होती. तो भूखंड विदर्भ फूडच्या आधी दुसºया एका उद्योजकाच्या ताब्यात होता व त्याच्याकडे ६७ हजार ८५ रुपयाचे वीज बिल थकीत होते. विदर्भ फूडने वीज पुरवठ्याची मागणी केली असता, त्यावेळच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने त्यांना आधीच्या उद्योजकाकडे थकीत असलेले ६७ हजार ८५ रुपयाचे वीज बिल भरण्यास सांगितले होते. सदर वाद उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. उच्च न्यायालयाने हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना, या पद्धतीने थकीत वीज बिलाची वसुली करता येऊ शकते का? हा कायद्याचा मुद्दा निर्धारित केला होता. अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या मुद्याचे उत्तर नकारात्मक दिले. विदर्भ फूडच्या वतीने अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा यांनी बाजू मांडली.

असा चालला न्यायालयीन लढासुरुवातीला विदर्भ फूडने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून, वीज मंडळाची कृती बेकायदेशीर ठरविण्याची विनंती केली. ४ डिसेंबर १९९९ रोजी दिवाणी न्यायालयाने वीज मंडळाची कृती अवैध ठरवली. त्या निर्णयाविरुद्ध वीज मंडळाने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. १ नोव्हेंबर २००४ रोजी जिल्हा न्यायालयाने वीज मंडळाला दिलासा देऊन दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे विदर्भ फूडने उच्च न्यायालयात द्वितीय अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

टॅग्स :Courtन्यायालय