शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मनपात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST

महिला दिन : समाजकल्याण व महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त ...

महिला दिन : समाजकल्याण व महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेचा समाजकल्याण विभाग आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यात साहस पुरस्कार प्राप्त, अनेक शिखर सर करणाऱ्या बिमला नेगी देवस्कर, पोलीस उपायुक्त विनिता साहू, कोविड काळात स्थलांतरित मजुरांसाठी कार्य करणाऱ्या मनपा निगम सचिव डॉ.रंजना लाडे, पर्यावरण क्षेत्रातील ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या सुरभी जयस्वाल, नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ.मीनाक्षी माने व पाचपावली केंद्र यशस्वीपणे हाताळणाऱ्या डॉ.मीनाक्षी सिंग आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, महिला व बालकल्याण सभापती दिव्या धुरडे, उपसभापती अर्चना पाठक, झोन सभापती स्नेहल बिहारे, अभिरुची राजगिरे, मनीषा अतकरे, प्रमिला मंथरानी, सोनाली कडू, सुषमा चौधरी, उज्ज्वला शर्मा, उपायुक्त राजेश भगत, समाजकल्याण अधिकारी दिनकर उमरेडकर आदी उपस्थित होते.

पुराणातील अरुंधती, स्वातंत्र्य समरातील झांशीची राणी, अहिल्याबाई होळकर, राणी दुर्गावती अशा वीर महिलांचा इतिहास या देशाला लाभला आहे. पळवाट न काढता निष्कर्षावर पोहोचून समस्यांचे निराकरण करणे, ही या देशातील महिलांची खुबी आहे. नेतृत्व करणारी, संस्कार देणारी, जागृती करणारी, दिशा देण्याचे कार्य करणारी स्त्री ही सर्वार्थाने महान असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले. प्रास्ताविकातून दिव्या धुरडे यांनी समाज विकास विभागाच्या वतीने शासनाच्या योजनांच्या स्त्रियांना लाभ देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कटिबद्ध. असल्याची गाव्ही दिली. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना देशमुख यांनी तर आभार नूतन मोरे यांनी मानले.

.......

दिव्यांगांना ट्रायसिकल तर महिलांना शिवणयंत्र

समाजविकास विभागाच्या वतीने विविध योजनेंतर्गत दिव्यांग महिलांना बॅटरी मोटोराइज्ड ट्रायसिकल आणि महिलांना शिवणयंत्राचे वाटप महापौर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.