शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मातृभूमीच्या सन्मानाला मोल नसते

By admin | Updated: September 8, 2015 05:22 IST

आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला

नागपूर : आपल्या मातेने सांगितलेल्या कामाचा मोबदला आपण मागत नाही, तसाच मातृभूमीच्या सन्मानासाठी केलेला त्यागसुद्धा अनमोल असतो. त्याचे मूल्य मागता येत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. देशभरात माजी सैनिकांनी ‘वन रॅँक वन पेन्शन’ साठी केलेले आंदोलन, म्हणजे मातृभूमीच्या सन्मानासाठी सैनिकांनी केलेल्या त्यागाचा मोबदला मागत असल्याची अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली.प्रहार मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित १९६५च्या भारत-पाक युद्धातील सैन्य अधिकाऱ्यांचा सत्कार सोमवारी रविनगर येथील संस्थेच्या सभागृहात करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. भागवत यांच्या हस्ते ग्रुप कॅप्टन एस.व्ही. फाटक, कर्नल विष्णू वडोदकर व कर्नल सुनील देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोहन भागवत यांनी सैनिकांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. १९६५ च्या युद्धात अपुऱ्या युद्ध संसाधनातही सेनेने जी कामगिरी केली ती भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. मातृभूमीसाठी युद्ध करणाऱ्या सेनिकांमध्ये मातृभूमीबद्दलची भक्ती ओतप्रोत भरलेली आहे. मातृभूमीच्या भक्तीमुळेच त्यांना जिंकण्याचे बळ मिळते. देशासाठी, समाजासाठी आपले आयुष्य वाहून टाकणाऱ्यांचाच गौरव होतो. वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण होते. पैशासाठी, सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्यांना समाजही तेवढ्याच लवकर विसरतो. सैनिकांच्या सन्मानाचे हे कार्यक्रम नियमित होणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात उपस्थित सत्कारमूर्तींनी १९६५ च्या युद्धाचे थरारक अनुभव उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुमिता जाना यांनी केले तर आभार शिवाली देशपांडे यांनी मानले. (प्रतिनिधी)लक्ष्य होते शत्रूला नेस्तनाबूत करण्याचे४कर्नल सुनील देशपांडे यांच्या सेकंड मराठा तुकडीने फिरोजपूर लाहोर सीमेवर पाकिस्तानी आक्रमण थोपविण्याचे आणि हुसैनीवाला पूल व भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या समाधीस्थळाची सुरक्षेची जबाबदारी दिली होती. ही जबाबदारी अतिशय चोख पार पाडली. कमांडचा आर्डर हुसेनीवाला पुलाच्या सुरक्षेचा असला तरी, तुकडीतील प्रत्येक सैनिकाला शत्रूला नेस्तनाबूत करायचे होते. ही कामगिरी पार पाडून शत्रूचे टॉवर सैनिकांनी उद्ध्वस्त केले. ग्रुप कॅप्टन श्रीकृष्ण फाटक हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट होते. १९६५ च्या युद्धात त्यांनी लढाऊ विमान शत्रूच्या क्षेत्रात नेऊन प्रत्युत्तर दिले होते. लढाईच्या काळात त्यांच्या विमानाला रॉकेटची धडक झाल्याने आकाशात विमानाने पेट घेतला. पॅराशूटच्या मदतीने भारताच्या भूमीवर परतले. कर्नल विष्णू वडोदकर यांनी १९६५ च्या युद्धात रेजिमेंट ८५ इन्फेंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले. पाकिस्तानी आर्टिलरी फायरिंगला सडेतोड उत्तर दिले. सेनेत अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहेसीमेवर तैनात राहून देशाची सुरक्षा करणाऱ्या भारतीय सेनेच्या जवानांनी शत्रूच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली नसती, तर आपणही अस्तित्वहीन असतो. मातृभूमीच्या भक्तीपोटी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचा गौरव करताना, त्यांचे अनुकरण आपण करायला हवे. आज बक्कळ पैसा कमविण्यासाठी मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनविण्याचा पालकांचा अट्टहास आहे, त्यामुळे मातृभूमीबद्दलचे प्रेम आटले आहे. परिणामी सेनेतील अधिकाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची खंत मोहन भागवत यांनी व्यक्त केली.