शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गरजू वकिलांना आर्थिक मदत करण्याची याचिका निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:11 IST

न्यायालयांतील कामकाज सुरू झाल्यामुळे आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा, हायकोर्ट बार असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्याद्वारे गरजू वकिलांची काळजी घेतली जात असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित जनहित याचिका निकाली काढली.

ठळक मुद्देन्यायालये सुरू झाली, बार कौन्सिल घेत आहे काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयांतील कामकाज सुरू झाल्यामुळे आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा, हायकोर्ट बार असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्याद्वारे गरजू वकिलांची काळजी घेतली जात असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित जनहित याचिका निकाली काढली. या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

खामगाव येथील अ‍ॅड. आरीफ शेख दाऊद यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील हजारो वकील रोजच्या कमाईवर अवलंबून आहेत. ते किरकोळ कामे करून पोटापुरते पैसे मिळवतात. त्यात नवोदितांपासून ते ज्येष्ठ वकिलांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनामुळे न्यायालयांचे नियमित कामकाज बंद करण्यात आले होते. परिणामी, कमाई बंद झाल्याने अनेक वकील आर्थिक अडचणीत सापडले. त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. अशा गरजू वकिलांना प्रत्येकी १० हजार रुपये वाटप करावे. बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवावर वकिलांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया रूल्समध्ये वकिलांच्या मदतीकरिता निधी उभारण्याची व गरजेच्या वेळी तो निधी वकिलांना वितरित करण्याची तरतूद आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.या प्रकरणात न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा, हायकोर्ट बार असोसिएशन व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांनी आपापले उत्तर सादर करून गरजू वकिलांच्या मदतीकरिता सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. बार कौन्सिल ऑफ इंडियाने ते गरजू वकिलांना आवश्यक सहकार्य करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने गरजू वकिलांना अन्नधान्याची किट दिली जात असल्याची माहिती दिली.

हायकोर्ट बार असोसिएशनने गरजू वकिलांना ४००० रुपये देण्याची तर, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने २००० रुपये देण्याची योजना सुरू केल्याचे सांगितले. तसेच, ही याचिका प्रलंबित असताना न्यायालयांमधील कामकाजातही समाधानकारक वाढ झाली. उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढताना या सर्व बाबी विचारात घेतल्या. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय