शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

By admin | Updated: May 25, 2017 01:45 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ...

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : वार्षिक आमसभेचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ग्रामविकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत व कृषी विभागाशी संबंधित छायाचित्रे काढून शासनाला तातडीने सुपूर्द करून पूर्ण झालेल्या कामांचे सरपंचाकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. खापरी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, भूमी अभिलेख, विद्युत पारेषण, महिला व बालकल्याण आदी विभागातील मंजूर कामे तसेच राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वार्षिक आमसभेत आढावा घेण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सदस्य रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने, पं.स. नागपूरच्या सभापती नम्रता राऊत, उपसभापती सुजित नितनवरे उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी नागपूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत शेतकऱ्यांची जाहीर सभा घ्यावी. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची समस्या, पिकांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घ्यावी. याकरिता कृषी अधिकाऱ्यांना जाहीर सभा घेण्याचा सूचना दिल्या. तसेच जलयुक्त शिवार अभियानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीरतेने व तातडीने कामे पूर्ण करावीत अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील योजनांचा आढावा घेतला.नागपूर तालुक्यातील रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची करण्यात यावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच सुरू असलेली कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांचे बांधकाम करतेवेळी मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी हजर राहावे, अशा सूचना केल्या. भूमिअभिलेख विभागातील शेतकऱ्यांसाठी योजनांचा आढावा घेतला. ग्रामीण भागापर्यंत सर्वांना वीज पुरवठा करण्यासाठी नागपूर तालुक्यामध्ये अनेक कामे सुरू आहेत. सदर कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच वीजसंबंधी सर्व समस्या दूर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. विजेसंबंधी ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्रामपंचायतमध्ये सहा महिने ग्राहक मेळाव्याचे आयोजन विद्युत पारेषण विभागाने करावे. यावेळी नागपूर तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.