शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानाचा संकल्प करा

By admin | Updated: August 26, 2014 01:04 IST

ज्यांना नत्रत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय? त्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय? नसल्यास अशा दृष्टिहीन देशबांधवांचाही जरूर विचार करा, त्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा,

मेडिकल : नेत्रदान पंधरवड्याला रॅलीने सुरुवातनागपूर : ज्यांना नत्रत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय? त्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय? नसल्यास अशा दृष्टिहीन देशबांधवांचाही जरूर विचार करा, त्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी येथे केले.मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर यादरम्यान २९ व्या ‘नेत्रदान पंधरवड्या’ चे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार दीनानाथ पडोळे होते. मंचावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, विभागप्रमुख डॉ. अशोक मदान उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी ‘नेत्रदान’ या विषयावर काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे व ‘नेत्रदानाचे महत्त्व आणि ते कसे करावे’ या विषयावर चित्रफितीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आ. पडोळे यांनी नेत्रदानाविषयी अंधश्रद्धा दूर होणे गरजेचे असून प्रत्येकाने जाता जाता डोळे दान करावे, असे आवाहन केले. डॉ. मदान यांनी मेडिकलच्या नेत्ररोग विभागातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची माहिती दिली. कार्यक्रमाला डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. गुप्ता, डॉ. सहस्रभोजने, डॉ. नरेंद्र तिरपुडे आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये मेडिकलचे विद्यार्थी, नर्सिंगचे विद्यार्थी, एनसीसीचे कॅडेट व नेत्र विभागाचे डॉक्टर व कर्मचारी मिळून ५०० जण सहभागी झाले होते. रॅली नेत्ररोग विभागापासून ते मेडिकल चौक, क्रीडा चौक ते तुकडोजी महाराज चौक येथून परत मेडिकल कॉलेज परिसरात आली. डॉ. चंदन टिपले यांनी क्रीडा चौक येथे नेत्रदानाविषयी मार्गदर्शन केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. मदान यांच्या मार्गदर्शनात डॉ. मोना देशमुख, डॉ. दिलीप कुमरे, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. राहुल डगवार, डॉ. नीलेश गद्देवार, डॉ. स्नेहल बोंडे , डॉ. जयश्री इखार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)