शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

जयताळ्यातील ९ हेक्टर जागेवरील आरक्षण रद्द

By admin | Updated: August 11, 2015 03:55 IST

मौजा जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीचे ठराविक कालावधीत भूसंपादन न केल्याने कायद्यानुसार या

नागपूर : मौजा जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीचे ठराविक कालावधीत भूसंपादन न केल्याने कायद्यानुसार या जागेवरील आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.मौजा जयताळा येथील खसरा क्र. १२२ व १६२ मधील ३.०९ जागेवरील आरक्षण या जागेचे मालक श्री मारोती देवस्थानातर्फे विनोद गुडधे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६ नुसार १ फेबु्रवारी २०१३ रोजी मनपाला सूचना बजावली होती. या जागेचा टीडीआर घेण्यात जागा मालकांनी नकार दिला होता. त्यामुळे २०१३-१४ च्या शीघ्रगणकानुसार या जागेची किंमत ६०,७६,४८,५०० गृहित धरण्यात आली होती. या जमिनीच्या भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याच भागातील २.०३ हेक्टर जमिनीसंदर्भात मालक कल्पना अशोक ठाकरे यांच्यातर्फे प्रफुल्ल गुडधे यांनी मनपाला सूचना नोटीस बजावली होती. या जागेच्या भूसंपादनासाठी ४०,९७,०४,७५० ची तरतूद करणे, तसेच मनीष गुडधे यांच्या मालकीची ४.१२ हेक्टर जमीन भूसंपादनासाठी ८३,१५,१९,००० ची तरतूद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. परंतु भूसंपादनाचा कालावधी संपला आहे की नाही, यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. नियमानुसार कालावधी संपला असल्याने हा प्रस्ताव परत पाठवून याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)समिती गठित करणार४शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागांचे भूसंपादन करण्याची गरज आहे की नाही, याबाबत चौक शी करण्यासाठी उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समिती अध्यक्षांच्या नियंत्रणात ही समिती काम करेल. समिती चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई४भूसंपादनाची कार्यवाही वेळीच न केल्याने आरक्षण रद्द झाले आहे. आरक्षणाला गरज असताना भूसंपादन केले नसल्याचे चौकशीत आढळून आल्यास या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सिंगारे यांनी दिला.अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही४जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीसंदर्भात अधिकाऱ्यांनी स्थायी पूर्वसूचना दिली नाही. याची वेळीच माहिती दिली असती तर अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करता आली असती. प्रस्तावाला विलंब झाल्याने व आर्थिक तरतूद नसल्याने हा विषय प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला.