शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सोनेगाव तलावाचे आरक्षण बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:23 IST

नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत सोनेगाव जलाशय म्हणून नामनिर्देशित आहे.

ठळक मुद्देसभागृहात प्रस्ताव : तलाव सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराच्या मंजूर विकास योजनेत सोनेगाव जलाशय म्हणून नामनिर्देशित आहे. १५ आॅक्टोबर २००३ च्या शासन अधिसूचनेनुसार तलावाचे क्षेत्र हेरिटेज संवर्धन स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. नगर भूमापन विभागाच्या नोंदीनुसार तलावाचे क्षेत्र १६५९ हेक्टर असून, तलावाची मालकी खासगी आहे.नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार नासुप्रच्या अखत्यारितील सात योजनांचे क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर शहराकरिता नागपूर महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार या तलावाचे सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी महापालिकेला तलावाची जागा संपादित करावयाची आहे.तलावाचे सौंदर्यीकरण व पुनरुज्जीवन करण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावयाची असल्याने, सदर आरक्षण विकास योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. याबाबतचे फेरबदल करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मंजुरीनंतर यावर आक्षेप व हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.विकास योजनेतील आरक्षण बदलणारमौजा सीताबर्डी नगर भूमापन क्रमांक १६९६ येथील १४८८.१० चौ.मी. जागा शहराच्या मंजूर सुधारित विकास योजना आराखड्यात वाणिज्य प्रयोजनासाठी आरक्षित दर्शविण्यात आलेली आहे. परंतु या जागेवर १०० वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम आहे. त्यामुळे या जागेच्या आरक्षणात बदल करण्याची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.खुल्या जागेचे आरक्षण बदलणारशहराच्या सुधारित मंजूर विकास आराखड्यात मौजा अंबाझरी येथील खसरा क्रमांक ६२ अंतर्गत २७०० चौ.मी. खुली जागा दर्शविण्यात आली आहे. या जागेच्या वापरात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कम ३७ अन्वये फेरबदल करून, या जागेचा निवासी वापरात समावेश केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.