शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

संताप...तणाव अन् आक्रोश

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

कामगारनगरातील चिमुकल्यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावत संतप्त जमावाने बहिणभावाची अंत्ययात्रा जरीपटका ठाण्यावर नेली.

जरीपटका ठाण्यावर मोर्चाचिमुकल्यांचा जीव गेला : पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप नागपूर : कामगारनगरातील चिमुकल्यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावत संतप्त जमावाने बहिणभावाची अंत्ययात्रा जरीपटका ठाण्यावर नेली. शव रस्त्यावर ठेवून ठाण्यासमोरच्या मार्गावरची वाहतूक तब्बल दोन तास रोखून धरत जमावाने पोलिसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला व आरोपीला फाशी द्या, अशी मागणी लावून धरली. या प्रकारामुळे जरीटपटका ठाण्यासमोर स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भावनिक आवाहन करीत संतप्त जमावाची कशी बशी समजूत काढली. त्यानंतर मृत बहीण-भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जरीपटक्यातील कामगारनगरात राहाणारे अकबरी खान मोहम्मद इलियाज (वय १३) आणि नुरैन अन्सारी मोहम्मद इलियाज (वय ११) या बहीण-भावांची त्यांचा नराधम मामा कुतुबुद्दीन ऊर्फ सुहानी अन्सारी (वय २६) सिवनी जिल्ह्यातील छत्तरपूर (मध्य प्रदेश) याने अपहरण करून हत्या केली आहे. आरोपी अन्सारीने २७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता अकबरी आणि नुरैन या दोघांना आपल्या मोटरसायकलवर (एमएच ३१/डीवाय २७५२) बसवले. ताजबागमधून फिरून येऊ, असे म्हणत आरोपीने भाच्यांना सोबत नेले, मात्र नंतर तो परतच आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे अपहृत बालकांचे वडील इलियाज यांनी २८ नोव्हेंबरला जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, तपासाबाबत तत्परता दाखवली नाही. तिकडे नराधम अन्सारीने भाच्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीच्या पात्रात फेकून तो पळून गेला. २८ नोव्हेंबरला मृतदेह मिळाल्यानंतर छपरा पोलिसांनी ओळख पटविण्याची तसदी न घेता मृतदेहावर अंत्यसंस्कारही करून टाकले. दरम्यान, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून मृत बालकांची माहिती कळाल्याने मुलांचे वडील छपरा ठाण्यात पोहचले. त्यानंतर छपरा पोलिसांनी जरीपटका ठाण्यात संपर्क करून बालकांची छायाचित्रे मागवून घेतली. त्यानंतर या हृदयद्रावक प्रकरणाचा उलगडा झाला. कामगारनगर सुन्न, ठाण्यासमोर स्फोटक स्थितीबहीण भावाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे कामगारनगर, कपिलनगर सुन्न झाले. सकाळपासूनच या भागातील नागरिक मृतदेह नागपुरात येण्याची वाट बघत होते. दुपारी २.३० च्या सुमारास मृतदेह घेऊन नातेवाईक कामगारनगरातील घरी पोहचले. त्यानंतर या निरागस जीवांची अंत्ययात्रा काढण्यात आली. तेव्हा नातेवाईकच नव्हे तर अनेक महिला-पुरुष, मुले अक्षरश: ढसाढसा रडत होते. सुमारे दीड ते दोन हजारांचा जमाव असलेली अंत्ययात्रा जरीपटका ठाण्यावर आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके तसेच प्रवीण पोटे, राकेश निकोसे विशाल साखरे, कुद्दूस अन्सारी, पंकज जाधव, मनोज कोंडापूरवार यांच्यासह संतप्त जमावाने पोलिसांविरोधात नारेबाजी केली.वेळीच आरोपींचे कॉल डिटेल्स काढले असते तर ही वेळच आली नसती, असा आरोप करून दोषी पोलिसांवरही कारवाईची मागणी केली.