शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याच्या ३० नवीन प्रजातींवर संशोधन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST

नागपूर : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) संत्र्याच्या ३० हून अधिक प्रजातींवर संशोधन सुरू आहे. यात मॅन्डेरिनच्या ...

नागपूर : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) संत्र्याच्या ३० हून अधिक प्रजातींवर संशोधन सुरू आहे. यात मॅन्डेरिनच्या ४, स्विट ऑरेंजच्या १६, लाइम लेमनच्या ८ व ग्रॅपफ्रुटस्‌च्या काही प्रजातींचा समावेश असून लवकरच त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जातील, अशी माहिती सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) संत्र्याच्या ३० हून अधिक प्रजातींवर संशोधन सुरू आहे. यात मॅन्डेरिनच्या ४, स्विट ऑरेंजच्या १६, लाइम लेमनच्या ८ व ग्रॅपफ्रुटस्‌च्या काही प्रजातींचा समावेश असून लवकरच त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जातील, अशी माहिती सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली.

संस्थेतर्फे यक्राे ग्रॅफ्टिंग’ व ‘शूट टीप ग्रॅफ्टिंग’ तंत्रज्ञानाद्वारे राेप निर्मिती व फळ उत्पादनापर्यंत लागणारा कालावधी कमी करण्यात यश आले आहे. संस्थेने गेल्या काही वर्षात मॅन्डेरिन सीडलेस-४, एनआरसीसी ॲसिड लाइम-७, ॲसिड लाइम-८, एनआरसीसी पामेलाे-५, एनआरसीसी ग्रॅपफ्रूट-६ या देशी प्रजाती, तर कटर व्हॅलेन्सिया, फ्लेम ग्रॅपफ्रूटस्‌ व पामेलाे युएस-१४५ या विदेशी प्रजाती विकसित करून शेतकऱ्यांना पुरविल्या आहेत. त्यातील मॅन्डेरिनची देशपातळीवर लोकप्रिय ठरली आहे, असेही घोष यांनी स्पष्ट केले.

लिंबूवर्गीय फळे (संत्रा, माेसंबी आदी) हे देशभरातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक म्हणून गणले जाते. लाखाे लाेकांची उपजीविका यावर अवलंबून आहे. त्यानुसार दरवर्षी देशात शेतकऱ्यांद्वारे सात ते साडेसात लाख राेपांची मागणी असते. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्थेत (सीसीआरआय) दरवर्षी ३ लाख राेगमुक्त राेपांची निर्मिती करून त्यांचे शेतकऱ्यांना वितरण केले जाते. स्थापनेच्या तीन दशकात संस्थेने ४० लाखांपेक्षा अधिक राेपे तयार करून वितरित केली आहेत. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, असा प्रश्न संस्थेला केला जाताे. मात्र, सीसीआरआय ही नर्सरी किंवा राेप तयार करणारे केंद्र नाही. ती संशाेधन संस्था असून, मुख्य काम लिंबूवर्गीय फळांवर संशाेधन करणे आहे.

संस्थेने गेल्या साडेतीन दशकात विविध संस्थांसह विद्यापीठांचे नेटवर्क तयार केले आहे. शेतकरी, संशाेधक, देश-विदेशातील विद्यार्थी अशा जवळपास ५३ हजार प्रतिनिधींना प्रशिक्षण दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रधान वैज्ञानिक डॉ. आशुतोष मुरकुटे उपस्थित होते.

आज ३७ वा स्थापना दिवस

२८ जुलै राेजी सीसीआरआय संस्थेचा ३७ वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त संस्थेच्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता हाेणाऱ्या कार्यक्रमात आयसीएआरचे माजी चेअरमन डाॅ. सी.डी. मायी, आयसीएआर-एनसीएसएसचे संचालक डाॅ. बी.एस. द्विवेदी, काॅटन रिसर्च संस्थेचे संचालक डाॅ. वाय.जी. प्रसाद प्रामुख्याने उपस्थित राहतील.