शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

रिपब्लिकन ऐक्यासाठी मंत्रिपद सोडायला तयार

By admin | Updated: July 2, 2017 02:34 IST

प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेत हा सत्कार समारंभ होणार म्हणून मी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले.

रामदास आठवले : भाऊ लोखंडे यांचा अमृत महोत्सवी सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रकाश आंबेडकरांच्या अध्यक्षतेत हा सत्कार समारंभ होणार म्हणून मी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्हावी, अशी माझी अपेक्षा होती. परंतु प्रकाश आंबेडकर आले नाहीत, याची खंत वाटते. हा दुरावा संपायला हवा. रिपब्लिकन ऐक्यासाठी पुढाकार घेतला जाणार असेल तर मी मंत्रिपदही सोडायला तयार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. डॉ. भाऊ लोखंडे अमृत महोत्सवी नागरिक सत्कार समितीच्यावतीने शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री दत्ता मेघे, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा,आ. जोगेंद्र कवाडे, आ. डॉ. मिलिंद माने, ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद खांडेकर,ई. मो. नारनवरे,डॉ. अटलबहादूर सिंग,डॉ. गिरीश गांधी व डॉ. नितीन राऊत उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भाऊ लोखंडे यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल,व मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. भाऊ लोखंडे यांना शुभेच्छा देताना आ. जोगेंद्र कवाडे म्हणाले, भाऊंनी आयुष्यभर लढवय्या बाणा जपला. अनेक संकटे आलीत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेला स्वाभिमानाचा मार्ग बदलला नाही. भाऊंचा हा सत्कार म्हणजे धम्म चळवळीचा सत्कार आहे. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, भाऊंचे सामाजिक योगदान अनुकरणीय आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा निष्ठा गहाण ठेवायची वेळ येते. परंतु अशा प्रसंगातही जो खचत नाही तोच माणूस इतिहास घडवत असतो. भाऊ या वाटेवरचे संघर्षदीप आहेत. दत्ता मेघे यांनीही आपल्या भाषणात डॉ. भाऊ लोखंडे यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. प्रास्ताविक डॉ. अटलबहादूर सिंग, संचालन डॉ. नितीन राऊत तर आभार डॉ. गिरीश गांधी यांनी मानले.