शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सलमानविरुद्ध गुन्हा नोंदवा

By admin | Updated: June 26, 2016 02:53 IST

महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य करणारा आघाडीचा अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध तक्रार देऊन पाच दिवस झाले ...

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सीताबर्डी ठाण्यात : धरणे, घोषणाबाजीनागपूर : महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य करणारा आघाडीचा अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध तक्रार देऊन पाच दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धरणे दिले. सलमानविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा, अशी त्यांची मागणी होती. ‘शूटिंगमुळे आलेल्या थकव्याने बलात्कार झालेल्या महिलेसारखी अवस्था झाल्यासारखे वाटते’, असे वादग्रस्त वक्तव्य करून गेल्या आठवड्यात सलमान खानने वादळ उठवले होते. त्याच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत मंगळवारी २१ जूनला सायंकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि स्थानिक नेत्या नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वात पन्नासावर महिलांनी झाशी राणी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सलमानच्या वक्तव्यामुळे सर्वच समाजातील महिलांचा अपमान झाला असून, त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी यावेळी तक्रार अर्जातून केली होती. कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीच्या महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. पोलिसांनी हा अर्ज ठेवून घेतला. मात्र, त्याने हे वक्तव्य आपल्या कार्यक्षेत्रात न केल्यामुळे पोलीस शांत बसले. त्याला आता पाच दिवस झाले. या पार्श्वभूमीवर, रेवतकर यांनी आज दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह सीताबर्डी ठाणे गाठून सलमानविरुद्ध गुन्हा दाखल का झाला नाही, अशी विचारणा केली. येथे गुन्हा दाखल करा किंवा शून्यची क्राईमी करून प्रकरण मुंबईला तपासासाठी पाठवा, अशी रेवतकर याची मागणी होती. त्यासाठी त्या रात्री ८.१५ पर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या देऊन होत्या. त्यामुळे पोलिसांची चांगलीच कोंडी झाली होती. (प्रतिनिधी)मुंबईला प्रकरण पाठविले : ठाणेदारहे प्रकरण मुंबईच्या बांद्रा पोलीस ठाण्यातर्फे हाताळले जात आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठांमार्फत हा तक्रार अर्ज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठविल्याची माहिती या अनुषंगाने ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लोकमतला दिली. तक्रारकर्त्यांचे समाधान करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करीत असल्याचेही बंडीवार यांनी सांगितले.