शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांचा अहवाल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:53 IST

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी नागपुरातील आढावा बैठकीत दिल्या.

ठळक मुद्देकारवाईचा इशारा : कृषिमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करण्याच्या सूचनादेखील बँकांना दिल्या आहेत. तरीही यात बँक टाळाटाळ करत असतील तर अशा बँकांचा अहवाल द्या आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी नागपुरातील आढावा बैठकीत दिल्या.मंगळवारच्या नागपूर जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषिमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नागपूर विभागाचा आढावा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचा आढावा घेतला. खते व बियाणे चढ्या भावाने विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. या बियाण्याच्या उगवण क्षमतेच्या प्रयोगाबाबत कृषी विभागाने गावपातळीवर मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.पीएम किसान योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. योजनेची व्यापकता वाढवून जास्तीत जास्त शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. युरियामुळे जमिनीचा पोत खराब होत असल्याचे निदर्शनास आले असून, युरियाचा जपून वापर करण्याबाबत जागृती करण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले. टोळधाडीचा आढावा घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी समजून घेतली. ड्रोन फवारणीच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. प्रधानमंत्री किसान योजनेत वर्धा जिल्हा व कर्जमुक्ती योजनेत चंद्रपूर जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

टॅग्स :agricultureशेतीministerमंत्रीbankबँकCrop Loanपीक कर्ज