शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांना पुन्हा पुन्हा हे सांगा.. करायला लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 12:28 PM

शाळा ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो या कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत सर्वांना खबरदारी घेणे फार आवश्यक आहे सर्वांची जीवनशैली ही इथून बदलणार आहे.

प्रमोद देशमुख(मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड)

नागपूर: ऑनलाइन शिक्षण हे नेहमीच्या शिक्षणापेक्षा वेगळं आहे हे तर उघड आहे. आज थोडाफार का होईना शिक्षकांनासुद्धा ऑनलाइन क्लास घेण्याचा अनुभव मिळाला किंवा शिकता आलं हे महत्त्वाचं. कोरोना हे वादळ लवकर संपणारे नाही. त्यामुळे या रोगाला सोबत घेऊनच पुढचे पाऊल असणार आहे. शाळा जरी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुरू होतील तरी काळजी घेऊनच एक एक पाऊल पुढे सर्वांना चालायचं आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांनी पुढे जायचं आहे. परंतु शाळा सुरू होतील मात्र पालकांना शिक्षकांना व समाजातील सर्व घटकांना जास्तीची खबरदारी घेणे गरजेचे आहे.शाळा ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो या कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत सर्वांना खबरदारी घेणे फार आवश्यक आहे सर्वांची जीवनशैली ही इथून बदलणार आहे.ऑफलाईन शिक्षण घेताना घ्यावयाची खबरदारीटप्प्याटप्प्याने जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा समोर समूह संसर्ग म्हणजेच कोरोनाची लागण हा धोका टाळण्यासाठी खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे१) मास्क घालणे अनिवार्य करणे गरजेचे आहे.२) वारंवार हात धुणे आवश्यक आहे.३) विद्यार्थ्यांशी संवाद मास्क घालून व एक मिटर अंतर ठेवूनच झाला पाहिजे.४) कोणत्याही वस्तूची आदान-प्रदान करू नये.५) विद्यार्थी आजारी असल्यास शाळेत पाठवू नये.६) हात धुतल्या शिवाय तोंडाला, नाकाला व डोळ्याला स्पर्श करू नये.७) स्वत:च्या वस्तूचा वापर स्वत: करावा.८)आपले हात साबणाने किंवा पाण्याने कमीत कमी पंधरा ते वीस सेकंद धुवा साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर कमीत कमी 60% अल्कोहल असलेले हॅन्ड सॅनीटायझर वापरा.९) आजारी असलेल्या लोकांशी संपर्क टाळा.ऑनलाईन शिक्षण घेताना घ्यावयाची खबरदारीऑनलाईन शिक्षण घेताना आत्ताच्या कठीण परिस्थितीत आपल्या मुलांना सगळीकडेच सोबतीची गरज आहे या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून काही टिप्स महत्त्वाच्या आहेत.१) रूटीन तयार करणे.ज्या शाळा ऑनलाईन सुरू आहेत त्यांच्या वेळा निश्चित केलेल्या असतातच पण इतर काही ऑनलाईन मटेरियल असेल त्यात व्हिडीओ बघणे, ऐकणे या गोष्टीचा समावेश असेल तर त्याचीही वेळ निश्चित केली पाहिजे म्हणजे दिवसभरात या गोष्टी किती वेळा आणि कधी करायच्या हे ठरवून ठेवणे महत्त्वाचे आहे.२) एकमेकांशी मोकळे बोलामुलांना प्रश्न विचारू द्या त्यांच्या भावना व्यक्त करू द्या सध्याच्या एकूण परिस्थितीत सर्वांवर तणाव असताना प्रत्येक मुलाची तान हाताळण्याची पद्धत वेगळी असते ताण हलका करण्यासाठी त्यांना समजून दिलासा देणे अतिशय गरजेचे आहे.३) वेळ द्या.पालकांनी मुलांसाठी वेळ देणे गरजेचे आहे ऑनलाइन प्रक्रियेत मुलांना एकटे सोडू नका सोबत राहून त्याची आवड वाढवा त्यांच्यासोबत गोष्टी करा अथवा गोष्टी सांगा.४) मुलांची ऑनलाईन सुरक्षानेहमीपेक्षा मुलं जास्त ऑनलाईन आहेत अशा वेळी त्यांच्या ऑनलाईन सुरक्षेकडे लक्ष द्या. इंटरनेटवरचे धोके मुलांना समजून सांगा वयानुसार साईट्स , मनोरंजनाच्या गोष्टी ते काय बघत आहे याकडे लक्ष ठेवा.५) मुलांच्या शाळेच्या संपर्कात राहा.ऑनलाईन शिक्षण सुरू असताना शाळेच्या शिक्षकाच्या संपर्कात राहणे व कोणत्याही कारणासाठी शिक्षकांशी संपर्क, संवाद करणे गरजेचे आहे.शाळा ऑफलाईन असो अथवा ऑनलाईन असो ही काळजी सर्व समाजघटकांना निदान इथपासून वर्ष दोन वर्ष घेणे गरजेचे आहे. म्हणजेच नवीन जीवनशैली अंगीकारणे अपेक्षित आहे. शासन प्रशासनाला स्वत: जबाबदारी स्वीकारून सर्व पूर्ववत आणणे गरजेचे आहे. कुठल्या एखाद्या घटनेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य वेशीला टांग ता येणार नाही म्हणून नियमांचं बंधन घालून सर्व हळु हळू पुर्ववत आणणे फार आवश्यक आहे.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र