केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आश्वासन दिले होते. मात्र याला हरताळ फासत सरकार देशात कृषी विरोधी धोरण राबवित आहे. नवीन कृषी कायदा रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्यावतीने दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सेवालदलाच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव किशोर गजभिये, कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, तुलसीराम काळमेघ, कृष्णा यादव , जि.प. सदस्य नाना कंभाले, नगरसेवक काशिनाथ प्रधान, नीरज लोणारे, राजकुमार गेडाम, शेख इरशाद ,अनुराग भोयर , माजी नगराध्यक्ष रतनलाल बरबटे, नीरज यादव, प्रमोद मानवटकर, मोहम्मद सुलतान, आबिद ताजी, विष्णु चनोले, सोहेल अंजुम,अब्दुल सलाम अन्सारी आदींचा समावेश होता.
नवीन कृषी कायदा रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:08 IST